लाथाडती सारे मला

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो तो भोगतो
जागाच आहे देव तो पापे तुझी तो मोजतो

लाथाडणारे पाय ते झेलू कसे छातीवरी
आसूड तो पाठीवरी का मारता हो रोज तो

त्या नित्य माझ्या घोषणा थापाच त्या बाता किती?
हे फार झाले बास हो मी रोज ते हो घोकतो

धावू किती मी सारखा लाथाडती सारे मला
मी रात्र सारी राबतो सारी फळे तो चोखतो

नाहीच आता वल्गना पक्केच केले आज ते
पाताळची आहे बरा ते दार मी हो ठोकतो

गझल: 

प्रतिसाद

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो तो भोगतो
जागाच आहे देव तो पापे तुझी तो मोजतो

छान. अल्लाह देख रहा है!

तोच आवडला. पण 'हो' वगैरे सारखे मात्रापुर्तीचे शब्द जरा खटकले.

क्षमस्व!

चित्तरंजन आणि बेफिकीर यांच्याशी सहमत.

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो तो भोगतो
जागाच आहे देव तो पापे तुझी तो मोजतो

धावू किती मी सारखा लाथाडती सारे मला
मी रात्र सारी राबतो सारी फळे तो चोखतो

आवडलेत.

सर्वांचे मनःपुर्वक आभार.