मरण्यात अर्थ नाही

मरण्यात अर्थ नाही

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे
.......................................

गझल: 

प्रतिसाद

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

वाह!! वाह!!

सुंदर . छान गझल.

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

अप्रतिम.

आपला,
(अग्रगामी) धोंडोपंत

छान !!

आहे तुला दिले मी, आयुष्य दान माझे.... असे जास्त प्रवाही वाटते ना?

धन्यवाद सर्वांचे.

आहे तुला दिले मी, आयुष्य दान माझे.... असे जास्त प्रवाही वाटते ना?

होय, असे जास्त प्रवाही वाटते.

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

अभय,
तखल्लुस एकदम चपखल बसलाय.

गंगाधरजी ,गझल खूप छानआहे .सुस्पष्ट विचार ,चिंतन आणि निटस बांधणी .मस्तच

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

वा!

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

वाह !!! क्या बात !!!

क्या बात है गंगाधरजी...
मतला सुंदरच आहे आणि...

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

बहोत खुब....

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

आता वळून मागे बघण्यात अर्थ नाही - वा वा!