कधी कधी

कधी कधी एखादी घटना समजत नाही
नाही कळली तरी फारसे बिघडत नाही

लाख वाटते, काही गोष्टी विसराव्या पण..
असा आजवर अनुभव की मी विसरत नाही

समोर जे जे येते, जातो सामोरा मी
छोट्याशाही अनुभवास मी चुकवत नाही

सुगंध, ताजेपणा खरे तर चार क्षणांचा
ख-या फुलांनी म्हणून काही सजवत नाही

जमेल तेव्हा लहानग्यांना हसवत बसतो
हसणा-या मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही

गझल: 

प्रतिसाद

समोर जे जे येते, जातो सामोरा मी
छोट्याशाही अनुभवास मी चुकवत नाही
आणि मक्ता मस्त. आवडली गझल.
सोनाली

जमेल तेव्हा लहानग्यांना हसवत बसतो
हसणा-या मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही

आवडला खुप....

मित्रा, तू लिहीलेल्या गझलेत काव्याचा झरा सांग...
रदिफ आणि काफिया सांभाळ्लेले गद्य म्हणजे गझल नव्हे

लाख वाटते, काही गोष्टी विसराव्या पण..
असा आजवर अनुभव की मी विसरत नाही>> छानच!

समोर जे जे येते, जातो सामोरा मी
छोट्याशाही अनुभवास मी चुकवत नाही>>> हाही साधासुधा व छानच!

जमेल तेव्हा लहानग्यांना हसवत बसतो
हसणा-या मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही>>> फारच आवडला.

केदारराव,

आपल्या गझला एकदम 'सच्च्या' वाटतात.

विद्यानंद हाडके:

मित्रा, तू लिहीलेल्या गझलेत काव्याचा झरा सांग...
रदिफ आणि काफिया सांभाळ्लेले गद्य म्हणजे गझल नव्हे>>>

माझ्यामते ही प्रतिक्रिया अयोग्य आहे.

जमेल तेव्हा लहानग्यांना हसवत बसतो
हसणा-या मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही

वा. छान झाली आहे गझल.

श्री केदार्जी उत्तम गझल आहे

४था शेर सोडून बाकी शेर आवडले

त्यातही १ले दोन

रामकुमार

आवडली खुप...!!!

सर्व प्रतिसादकांचे आभार.

गझल आवडली.

छान गझल.

गझल आवडली.