माळले गजरे तयांनी वाळलेले...!

का ढगांनी बरसण्याचे टाळलेले..?
नाचरे हे मोर आम्ही पाळलेले ...

त्या फ़ुलांनी सोडलेले बहरणेही...
का कळ्यांचे स्वप्न त्यांनी जाळलेले...?

मीच घेतो प्राक्तनाचा ठाव माझ्या
नेहमी मजला सुखांनी गाळलेले ...

राग मी करतो सखीच्या कुंतलांचा
माळले गजरे तयांनी वाळलेले...!

चोर का त्यांनी म्हणावे लोचनांना ?
हे नयन त्या चेहर्‍यावर भाळलेले...

आज 'वेडे', शब्द थोडे आळवावे
रे विशाला काव्य तूही चाळलेले...

विशाल

गझल: 

प्रतिसाद

पहिल्या दोन ओळी कुठेतरी वाचनात आल्या होत्या.
हे ढगांनी बरसण्याचे टाळलेले
नाचणारे मोर होते पाळलेले..... असा काहिशा ओळी होत्या त्या.

मी थोडासा बदल करुन पुढे कंटीन्यू केले. गुरूजनांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा :)

राग मी करतो सखीच्या कुंतलांचा
माळले गजरे तयांनी वाळलेले...

व्वा.. छान शेर.

आवडली गझल. :)

राग मी करतो सखीच्या कुंतलांचा
माळले गजरे तयांनी वाळलेले...

व्वा.. छान शेर.

आवडली गझल

मनःपूर्वक आभार :)