भेट ही घेऊ नको

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ नको
मी कघी येणार नाही वाट तू पाहू नको

एकटा माणूस आला .एकटा जाणारही
माहिती आहे तुला तू सोबती होऊ नको

शांत मी माझ्या घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही येऊ नको

आपला मोठेपणा सांगावया लोकांपुढे
तेचते बाजार बसवे शब्द तू चिवडू नको

" धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही या जगी "
या विचारांनी पुन्हा बाजी कुठे मारू नको

एकटी चालेल "शोभा " सोबती वाचूनही
तू तुझा संदेश किंवा सारथी धाडू नको

गझल: 

प्रतिसाद

आपला मोठेपणा सांगावया लोकांपुढे
तेचते बाजार बसवे शब्द तू चिवडू नको - छान!

शेवटचे दोनही आवडले.

धन्यवाद!

चांगली गझल!

छान!!!!!

एकटी चालेल "शोभा " सोबती वाचूनही
तू तुझा संदेश किंवा सारथी धाडू नको

मक्ता...सुंदर!

शोभाताई, सर्वच शेर खुप छान आहेत!
आवडले,
रामकुमार

सगल्याची आभारी आहे.

शोभाताई गझल आवडली. स्वागत!

गझलेतली खंबीरता आवडली.

शोभाताई, फार छान ....गझल आवडली.
" धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही या जगी "
या विचारांनी पुन्हा बाजी कुठे मारू नको

छान!