दिसे दिसायास...
दिसे दिसायास वार साधा
नसे परी हा प्रकार साधा
अजून आहे घरंगळत मी
नको म्हणू हा उतार साधा
किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा
फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा
धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा
कधी मला माग तू हवे जे
कळेल...नाही उदार साधा
बरेचदा श्वास टाळतो मी
नकोस समजू चुकार साधा
- वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
रवि, 23/01/2011 - 17:12
Permalink
साधेपणा, सहजता
साधेपणा, सहजता आवडली....
मस्तच..
ज्ञानेश.
रवि, 23/01/2011 - 21:48
Permalink
क्या बात है वैभवराव ! अप्रतिम
क्या बात है वैभवराव ! अप्रतिम गझल, नेहमीप्रमाणेच.
अजून आहे घरंगळत मी
नको म्हणू हा उतार साधा
फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा
हे दोन्ही शेर फार आवडले !
धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा
सुरेख.
अवांतर- मागच्या वेळची 'चूक' (शेषाच्या फण्यावर पृथ्वी डोलते..) तातडीने दुरूस्त केलीत, हे आवडले. ;)
कधी मला माग तू हवे जे
कळेल...नाही उदार साधा
अनिल रत्नाकर
रवि, 23/01/2011 - 23:53
Permalink
लाजवाब... कंजुषी ,फारच
लाजवाब...
कंजुषी ,फारच छान.
बेफिकीर
सोम, 24/01/2011 - 10:13
Permalink
व्वा! ज्ञानेशरावांशी पूर्ण
व्वा!
ज्ञानेशरावांशी पूर्ण सहमत! सगळीच गझल मस्तच आहे वैभवराव!
धन्यवाद!
वैभव देशमुख
सोम, 24/01/2011 - 11:04
Permalink
ज्ञानेश- अवांतर- मागच्या
ज्ञानेश-
अवांतर- मागच्या वेळची 'चूक' (शेषाच्या फण्यावर पृथ्वी डोलते..) तातडीने दुरूस्त केलीत, हे आवडले. ;)
ती चूक नव्हती
ती कल्पना त्या शेरात बरोबर होती
आणि ही या शेरात...
धन्यवाद...
बेफिकीर
सोम, 24/01/2011 - 11:13
Permalink
अवांतर- मागच्या वेळची 'चूक'
अवांतर- मागच्या वेळची 'चूक' (शेषाच्या फण्यावर पृथ्वी डोलते..) तातडीने दुरूस्त केलीत, हे आवडले. ;>>>
हा संदर्भ मला माहीत नसल्यामुळे 'या बाबीशी मी सहमत आहे' असा अर्थ कृपया घेतला जाऊ नये. ज्ञानेशरावांनी केलेली दिलखुलास स्तुती मला आवडली व तिच्याशी मि सहमत आहे.
धन्यवाद!
वैभव देशमुख
सोम, 24/01/2011 - 12:50
Permalink
बेफिकीरजी ज्ञानेशरावांनी
बेफिकीरजी
ज्ञानेशरावांनी केलेली दिलखुलास स्तुती मलाही आवडली
तुमच्याही प्रतिसादाचा मी तुम्हाला अपेक्षित असाच अर्थ घेतला
गैरसमज नसावा....
जुना शेर असा आहे
नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
प्रुथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...
हा मी पौराणिक संदर्भाने लिहिला होता ..
धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा
आणि हा आताच्या संदर्भाने... (माझ्या द्रुष्टीने)
धन्यवाद...
चित्तरंजन भट
सोम, 24/01/2011 - 13:51
Permalink
फसून जातो सहज कुठेही खरेच मी
फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा
वाव्वा वैभव. एकंदर गझल सहज, सुरेख झाली आहे.
कैलास
सोम, 24/01/2011 - 13:59
Permalink
सुंदर...
सुंदर...
शाम
गुरु, 27/01/2011 - 20:49
Permalink
नेहमी
नेहमी प्रमाणे......भन्नाट!!!!!
ज्ञानेश.
गुरु, 27/01/2011 - 23:30
Permalink
@वैभवराव, ती चूक नव्हतीच हो.
@वैभवराव,
ती चूक नव्हतीच हो. तसे नाही म्हणायचे मलाही.
कोणालातरी तसे वाटले आणि तुम्ही (गंमतीत) चूक झाल्याचे म्हटले होते, ते आठवले.
असो.
गझल परत एकदा फार आवडल्याचे नमूद करतो.
विद्यानंद हाडके
गुरु, 17/02/2011 - 22:50
Permalink
धरा फिरवतात हात
धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा
ये ब्बात..........
वैभवराव, कामगाराची महती आहेच मोठी.
कैलास गांधी
बुध, 04/04/2012 - 13:38
Permalink
अजून आहे घरंगळत मी नको म्हणू
अजून आहे घरंगळत मी
नको म्हणू हा उतार साधा
फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा
धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा
सुंदर लगे रहो...