कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा...

नवीन रस्ते बघून बसली ,कोठे दडून स्वप्ने
उगाच आशा नव्यानव्याची, होती धरून स्वप्ने...

कधी कुठे झगमगाट दिसला, केला कुणी इशारा...
तुझीच फसली कशी कळेना ,डोळे दिपून स्वप्ने

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा...
म्हणे कुशीवर निजून होती, तेव्हा वळून स्वप्ने

तुला कधीही जरा न कळले, शब्दास मान देणे
किती जिवाची भिरभिर झाली, गेली उडून स्वप्ने

अजूनही या मनात आहे, आशा टिकून वेडी
हळूच तू मंतरून गेला ,माझी दुरून स्वप्ने

तुझी खुशाली बनून येते जेव्हा झुळूक आता
मनात माझ्या दरवळती ही तेव्हा फुलून स्वप्ने

गझल: 

प्रतिसाद

तुला कधीही जरा न कळले, शब्दास मान देणे
किती जिवाची भिरभिर झाली, गेली उडून स्वप्ने

तुझी खुशाली बनून येते जेव्हा झुळूक आता
मनात माझ्या दरवळती ही तेव्हा फुलून स्वप्ने

शेर आवडले सोनालीताई!

धन्यवाद!

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा...
म्हणे कुशीवर निजून होती, तेव्हा वळून स्वप्ने

अजूनही या मनात आहे, आशा टिकून वेडी
हळूच तू मंतरून गेला ,माझी दुरून स्वप्ने
वाह!!!
:)

तुझी खुशाली बनून येते जेव्हा झुळूक आता
मनात माझ्या दरवळती ही तेव्हा फुलून स्वप्ने
आवडला..!

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा...
म्हणे कुशीवर निजून होती, तेव्हा वळून स्वप्ने

निव्वळ अप्रतिम !!