''तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे''
मरुन अस्तित्वहीन होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात माझा,जगावयाला नकार आहे
धरून सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले दिवेही
असा कसा दूर व्हावयाचा,मनातला अंधकार आहे
अचूक आले तुझे नयन बाण्,येथ घायाळ जाहलो मी
शिकार गेलो करावयाला,स्वतःच झालो शिकार आहे
नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे
कधीच कर्जात राहिलो ना ,म्हणून ”कैलास” अंत आला
जगू कसे हे जिणे तसे तर तुझ्याकडूनच उधार आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शनि, 29/01/2011 - 14:30
Permalink
मस्त !
मस्त !
शाम
मंगळ, 01/02/2011 - 19:09
Permalink
नको धरु आज हात माझा,कठोर ही
नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे. छान!!
शाम
मंगळ, 01/02/2011 - 19:10
Permalink
.
.
स्नेहदर्शन
गुरु, 03/02/2011 - 16:51
Permalink
शिकार गेलो करावयाला,स्वतःच
शिकार गेलो करावयाला,स्वतःच झालो शिकार आहे
झालो हे भुतकाळ आहे आणि आहे हा वर्तमान कहीतरी चुकते आहे
कैलास
गुरु, 03/02/2011 - 21:12
Permalink
पूर्ण भूतकाळ आहे. कंप्लीट
पूर्ण भूतकाळ आहे. कंप्लीट पास्ट टेन्स.
गद्यात असे लिहीले जाईल. स्वतःच शिकार झालो आहे.
पद्यात = स्वतःच झालो शिकार आहे
कमलाकर देसले
शुक्र, 04/02/2011 - 21:17
Permalink
कैलासजी ,मस्तच
कैलासजी ,मस्तच
अनिल रत्नाकर
शनि, 05/02/2011 - 00:29
Permalink
अप्रतिम. तुझा हात आम्ही
अप्रतिम.
तुझा हात आम्ही उद्याही सोडणार (नाही आहोत.)
विद्यानंद हाडके
गुरु, 17/02/2011 - 14:02
Permalink
मरुन अस्तित्वहीन
मरुन अस्तित्वहीन होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात माझा,जगावयाला नकार आहे............... मस्त मतला , लय सुंदरच
धरून सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले दिवेही
असा कसा दूर व्हावयाचा,मनातला अंधकार आहे........,..........क्या ब्बात है