जराजरासा !!!

जराजरासा !!!

तुझे नि माझे नकोच नाते, हवा दुरावा जराजरासा !
सलज्ज तारे नभी पहाया रवी झुरावा जराजरासा !!

लुभावयाला कितीक फ़ुलती गुलाब, जाई नि मोगरेही,
तुझ्या स्मृतींचा सुगंध ताजा, इथे उरावा जराजरासा !!

झपाटलेला पिसाट वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा उरो पुरावा जराजरासा !!

कधी नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती रदीफ़ मिसरे,
नजाकतीचाच शेर ओठी अता स्फ़ुरावा जराजरासा !!

कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !!

घडी भराची नकोच संगत करार व्हावा युगांतरीचा,
तुझ्याच श्वासात श्वास माझा, अता विरावा जराजरासा !!

-सुप्रिया (जोशी) जाधव..

गझल: 

प्रतिसाद

नव नवीन प्रतिमा...आणी खुप सुंदर आंतरीक लय....साधली आहे..

वाहवा....

झपाटलेला पिसाट वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा उरो पुरावा जराजरासा !!

कधी नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती रदीफ़ मिसरे,
नजाकतीचाच शेर ओठी अता स्फ़ुरावा जराजरासा !!

कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !

वावा! छानच! मस्त शेर!

अभिनंदन!

-'बेफिकीर'!

मस्त

एकंदर छान झाली आहे गझल. काही सुट्या ओळी फार छान.
उदा.
तुझे नि माझे नकोच नाते, हवा दुरावा जराजरासा !
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !

अप्रतिम गझल आहे! :)

वावा! छानच!

झपाटलेला पिसाट वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा उरो पुरावा जराजरासा !!
वाह!!!
सुटे मिसरेही आवडले... :)

अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अप्रतिम...............

मुरंबा मस्तच!

तुझे नि माझे नकोच नाते, हवा दुरावा जराजरासा !
सलज्ज तारे नभी पहाया रवी झुरावा जराजरासा !!

कधी नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती रदीफ़ मिसरे,
नजाकतीचाच शेर ओठी अता स्फ़ुरावा जराजरासा !!

कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !

मस्त शेर!

वावा! छानच!

कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !!

घडी भराची नकोच संगत करार व्हावा युगांतरीचा,
तुझ्याच श्वासात श्वास माझा, अता विरावा जराजरासा !!

मनाला विशेष भावलेले शेर
मस्त मस्त मस्तच!
अप्रतिम.... प्रेमळ रस

आभार मंडळी...

आवडली... काही शेर मस्तच!