आयुष्य गोल आहे
टाळतो किती मी त्यांचा ससेमिरा पण, सायास फोल आहे
तीच तीच नाती भेटायचीच कारण... आयुष्य गोल आहे
टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
रोजच्या झळांनी गेली सुकून स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे जराशी अद्याप ओल आहे
शेवटी मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे, किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या दुकानी इतकेच मोल आहे?
दर्शनास डोळे आतूरले कधीचे... पण पालखी दिसेना
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे
घेउनी भरारी... आव्हान अंबराला देशीलही मना पण
ठेव फक्त ध्यानी... सांभाळला तुझाही त्यानेच तोल आहे
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 11/01/2011 - 12:38
Permalink
टाकले खडे मी नाना प्रकारचे
टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
छान..
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे
वा.. ताशा आणि ढोल आवडले.
ही अशी वृत्ते वाचताना त्रासदायक ठरू शकतात. पण विरंगुळा म्हणून छान आहे एकंदर.
क्रान्ति
मंगळ, 11/01/2011 - 20:46
Permalink
रोजच्या झळांनी गेली सुकून
रोजच्या झळांनी गेली सुकून स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे जराशी अद्याप ओल आहे
खासच!
बेफिकीर
बुध, 12/01/2011 - 00:56
Permalink
दोन्ही प्रतिसादकांशी सहमत!
दोन्ही प्रतिसादकांशी सहमत!
-'बेफिकीर'!
सोनाली जोशी
शुक्र, 14/01/2011 - 20:13
Permalink
टाकले खडे मी नाना प्रकारचे
टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
मस्त