कळा लागल्या
कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!
जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून होत्या
तुला पाहता मी मलाही भुलावे,
अशा सूचना काळजातून होत्या!
कशी बाग माझी मला सापडावी?
कळ्या वेगळा गंध माळून होत्या
मला हारण्याचीच संधी मिळाली,
तुझ्या सोंगट्या डाव साधून होत्या!
जगावेगळे भाग्य दारात आले,
[तशा चाहुली कालपासून होत्या!]
तुझ्या अंगणी सावल्या या कुणाच्या
सुखाची खुळी आस लावून होत्या?
कुणाला, किती, कोणते दु:ख द्यावे?
मुक्या कुंडल्या सर्व जाणून होत्या
कशाची सजा आणि माफी कशाची?
चुका फक्त माझ्याच हातून होत्या!
गझल:
प्रतिसाद
कैलास
शनि, 01/01/2011 - 10:00
Permalink
क्या बात है..... एकदम गोटीबंद
क्या बात है..... एकदम गोटीबंद गझल.... कुण्या एका शेराचा उल्लेख करायला नको. सगळेच शेर छान.
आनंदयात्री
सोम, 10/01/2011 - 20:24
Permalink
खरंय... गोटीबंद
खरंय... गोटीबंद गझल....
"सूचना" आवडला... :)
चित्तरंजन भट
मंगळ, 11/01/2011 - 12:45
Permalink
छान. पण बऱ्याच द्विपदी
छान. पण बऱ्याच द्विपदी अधुऱ्या किंवा थोड्या सपाट वाटल्या.