बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती
प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती
केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती
पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
गझल:
प्रतिसाद
supriya.jadhav7
गुरु, 02/12/2010 - 19:33
Permalink
पाने निखळावी जुन्या
पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
अप्रतिम शेर क्रांन्ति.
बेफिकीर
गुरु, 02/12/2010 - 21:00
Permalink
'इम्प्रेसिव्ह' गझल!
'इम्प्रेसिव्ह' गझल!
आनंदयात्री
शुक्र, 03/12/2010 - 21:37
Permalink
शेवटचे दोन फार आवडले.. By the
शेवटचे दोन फार आवडले..
By the way, वृत्त कुठलं आहे??
बहर
शनि, 04/12/2010 - 07:32
Permalink
खणखणीत!! वा!
खणखणीत!! वा!
कैलास
शनि, 04/12/2010 - 09:54
Permalink
मतला फार आवड ला..... वा !!
मतला फार आवड ला..... वा !!
विजय दि. पाटील
मंगळ, 07/12/2010 - 11:25
Permalink
मतला आणि शेवटचा शेर....खूपच
मतला आणि शेवटचा शेर....खूपच आवडले
चित्तरंजन भट
सोम, 13/12/2010 - 13:07
Permalink
तहहयात माझे निशाण शुभ्र,
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
वा. एकंदर छानच झाली आहे. "तहाचे"ला कंसात टाकले नसते तरी बहुधा चालून गेले असते असे वाटले.
वैभव देशमुख
मंगळ, 11/01/2011 - 11:29
Permalink
पाने निखळावी जुन्या
पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
वा! ! मस्तच..
कमलाकर देसले
मंगळ, 11/01/2011 - 21:24
Permalink
तहहयात माझे निशाण शुभ्र,
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!क्या बात है ! क्रांती , हा शेर म्हणजे ...झालासे कळस !