''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते''
एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत वाटते
हात ते फैलावणे,आता न स्वागत वाटते
गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
भांडला ''कैलास'' इतुका कडकडा सार्यांसवे,
मूक माझे राहणेही भांडल्यागत वाटते.
--डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 02/12/2010 - 10:56
Permalink
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
वावा.. फारच आवडला. क्या बात है. एकंदर छान झाली आहे गझल.
क्रान्ति
गुरु, 02/12/2010 - 15:15
Permalink
गोड वाणी मागचे अनुभव कडू
गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
वा! मस्त! कलागत ही ओळ तर खूपच खास!
सोनाली जोशी
गुरु, 02/12/2010 - 15:31
Permalink
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
वावा! हा शेर फार आवडला!
बेफिकीर
गुरु, 02/12/2010 - 21:03
Permalink
सावली माझी मला मोठी दिसाया
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
व्वा!
supriya.jadhav7
गुरु, 02/12/2010 - 22:17
Permalink
गोड वाणी मागचे अनुभव कडू
गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
अप्रतिम एक एक शेर!
बहर
शनि, 04/12/2010 - 04:54
Permalink
मतला फारच सुंदर झाला
मतला फारच सुंदर झाला आहे...वा!
शाम
शनि, 11/12/2010 - 19:43
Permalink
सावली माझी मला मोठी दिसाया
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
.....सुंदर!!!
कैलास
शनि, 25/12/2010 - 10:43
Permalink
सर्वांचे मनःपूर्वक आभार. :)
सर्वांचे मनःपूर्वक आभार. :)
वैभव देशमुख
शनि, 25/12/2010 - 13:55
Permalink
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
मस्त गझल...
धोंडोपंत
रवि, 26/12/2010 - 10:26
Permalink
सुंदर. मक्ता तर खासच
सुंदर. मक्ता तर खासच आवडला.
मूक माझे राहणेही भांडल्यागत वाटते.........
क्या बात कहीं है|
शुभेच्छा.
धोंडोपंत
अनिल रत्नाकर
बुध, 29/12/2010 - 23:48
Permalink
सावली माझी मला मोठी दिसाया
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
अप्रतिम.
विझताना वात मोठी होते ?.
कमलाकर देसले
शनि, 15/01/2011 - 23:06
Permalink
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते
कैलासजी ,अप्रतिम गझल .हे शेर तर खूप आवडले
कैलास गांधी
बुध, 26/01/2011 - 12:00
Permalink
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )
कैलासजी ,अप्रतिम!!!!!!