तू .....
तू .....
.
*
कधी, कशी, कुठे सखे, नभा मिळे धरा इथे?
न सावलीस लाभणार चेहरा खरा इथे !
*
पहाट पारिजात हा जरी लुभावि अंगणा ,
तुझाच गंध माळुनी सलज्ज मोगरा इथे !
*
उठायचे निजायचे सुरू रहाटगाडगे,
अजून ’याद’ कोवळी सतावते जरा इथे !
*
तुझी ’अदा’ तुझी नशा तना-मनास पेटवी,
’खडा’ दुधात टाकणार भास बोचरा इथे !
*
पुन्हा मला कुशीत घेत शब्द पेंगले जरी ,
तुझ्याच आठवात दंग कैफ़ नाचरा इथे !
*
प्रहार लक्ष झेलण्यास काळरात्र झुंझली,
तरी नवाच भासतो अरुण हासरा इथे !
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
बहर
शनि, 27/11/2010 - 14:42
Permalink
वा सुप्रियाताई... सुंदर !!!
वा सुप्रियाताई... सुंदर !!!
आनंदयात्री
शनि, 27/11/2010 - 20:41
Permalink
वाह!! गझल आवडली.. तुम्ही
वाह!!
गझल आवडली..
तुम्ही वेगवेगळ्या वृत्तात गझला लिहीत आहात ह्याला दाद!!
supriya.jadhav7
मंगळ, 30/11/2010 - 08:43
Permalink
'बहर' जी... 'आनंदयात्री'
'बहर' जी...
'आनंदयात्री' जी....
इथल्या गजला आणि आपल्या सारख्या जाणकारांचे मार्गदर्शन लिहीण्यास उदयुक्त करतात.
धन्यवाद!!!