प्रकाश स्वप्ने..

प्रकाश स्वप्ने पहात होतो..
तरिही खितपत रहात होतो..

अनुरागाला समजुन ओझे..
व्यथा उगा मी वहात होतो!!

हातावरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो..

स्वप्न कोवळे..केविलवाणे..
नियमाने मी पहात होतो..

पुन्हा तुझे हे जवळुन जाणे..
लांब जरी चार हात होतो!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

बहर?

नमस्कार हबा... काय खबर?

स्वप्न कोवळे..केविलवाणे..
नियमाने मी पहात होतो..

वा..

पुन्हा तुझे हे जवळुन जाणे..
लांब जरी चार हात होतो!

वा..

एकंदर छान.

शेवटचा आवडला... :)

प्रकाश स्वप्ने पहात होतो..
तरिही खितपत रहात होतो.. .......व्वा मतला सुन्दरच

हातावरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो.. ............ हा शेर भिड्ला
बहर भैय्या आने दो और आपके खजानेमे से.....
काफि इंतजार करवाते हो आप....

बहरली...!!!

मतला छानच!!

बाकी ठीक-ठाक..

१,३,४ फार छान.... पुलेशु.

सर्व प्रतिसादकांचे आभार.

हातावरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो..

स्वप्न कोवळे..केविलवाणे..
नियमाने मी पहात होतो..

पुन्हा तुझे हे जवळुन जाणे..
लांब जरी चार हात होतो

हे सर्व शेर आवडले. मस्तच!

धन्यवाद!

हातावरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो..हा शेर खूप आवडला

बेफिकीर..विजय पाटील.. आभारी आहे.