एक होऊ या क्षणी

एक होऊ या क्षणी, नंतर नको
या घडीला आणखी जर तर नको

कुंतलांचा दूर कर पडदा जरा
-तेवढेही यापुढे अंतर नको

मीलनाची शृंखला तोडू नको..
आपल्याला आज मध्यांतर नको

प्रश्न स्पर्शानेच करतो मी तुला
अक्षरांनी एकही उत्तर नको

गंध श्वासांचाच दोघांच्या लटू
कोणतेही वेगळे अत्तर नको

सर्वांचे दीपावली अभिष्टचिंतन !

गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल केदारजी.

कोणत्याही एका शेराचा उल्लेख करणे चूक ठरेल. :)

भन्नाट गझल....

प्रत्येक शेर लाजवाब!!!

खूप खूप आवडली गझल.

गझल आवडली...!!!!
सगळेच शेर..भावने इतकेच तरल..सहज..सुंदर!

तांत्रिकदृष्ट्या चुकलेली, आशयाने 'मधुर' व लोभस शब्दरचना असलेली काव्यरचना!

केदार,

काय झाले आहे??

प्रश्न स्पर्शानेच करतो मी तुला
अक्षरांनी एकही उत्तर नको

भन्नाट!!!

हम्म.. छान आहे.
But something is missing. Please try to figure it out.

Regards.

तंत्रामध्ये गडबड आहे!!!
बाकी झक्क्क्क्कास!! :)

सर्वांचे आभार मानतो.