का....?(गझल)

नेहमीचे हे तराणे तू असा टाळून गेला
पापण्यांना आसवांची तोरणे माळून गेला !!

नेहमीचा तोच तोरा तीच पुन्हा बेफिकीरी
का असा हा जीव वेडा त्यावरी भाळून गेला !!

काळजाचा ठाव घेणे पाहुनीही ना पहाणे
पोळलेल्या जाणिवांना का पुन्हा जाळून गेला !!

हुंदक्याचा भार झाला एक एका आठवांना
श्रावणाच्या धुंद राती मोगरा वाळून गेला !!

शाप आहे हा मला उ:शाप मागू मी कुणाला
फाटक्या झोळीस माझ्या तो जणू चाळून गेला ..!!

ममता....

प्रतिसाद

ताई, मतला आणि नंतरचे दोन शेर अप्रतिम!

नंतर पकड सुटल्या सारखे वाटते!

पण एकंदर छान! आवडली

पुन्हा या शब्दाचा उच्चार करताना पु हा absolutely लघुच होतो. आपण "तीच पुन्हा" हे गा ल गा गा असे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पुन्न्हा असं वाचावं लागेल.

हुंदक्याचा भार झाला एक एका आठवांना
श्रावणाच्या धुंद राती मोगरा वाळून गेला !!


सुरेख!!

आनंदयात्रींशी सहमत.......

खूप खूप आभार....
विद्यार्थिनी अजून शिकाऊ आहे...
आता न चुकता लिहिण्याचा प्रयत्न...दरवेळेस...!!

ममता....

खूप खूप आभार....
विद्यार्थिनी अजून शिकाऊ आहे...
आता न चुकता लिहिण्याचा प्रयत्न...दरवेळेस...!!

ममता...