अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा......
मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.....
पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी
उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती
बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........
मयुरेश साने ........दि..१६-ओक्ट-10
गझल:
प्रतिसाद
शाम
शनि, 23/10/2010 - 09:15
Permalink
जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा
जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा......
खूप आवडला...
मयुरेश साने
शनि, 23/10/2010 - 09:23
Permalink
खुप खुप आभारी आहे
खुप खुप आभारी आहे
आनंदयात्री
शनि, 23/10/2010 - 09:42
Permalink
सुंदर गझल...
सुंदर गझल...
कैलास
शनि, 23/10/2010 - 10:56
Permalink
शामने नमुद केलेला शेर
शामने नमुद केलेला शेर आवडला....
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी
उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.
हा शेर संदिग्ध वाटला. पुलेशु.
चित्तरंजन भट
रवि, 24/10/2010 - 11:00
Permalink
पुसू कश्या तुझ्या स्मृती ?
पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
वा.
मुशायऱ्याची द्विपदीही विशेष. एकंदरच गझल छान आहे.