आजही अप्रूप वाटे
आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्या आरश्यांचे...!
पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...
नावही ज्यांचे कुणाला ज्ञात नाही,
कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!
कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 06/08/2007 - 18:57
Permalink
सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
मस्त गझल. त्यातही
कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
वावा. पावश्यांचे
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
वाव्वा...
हे फारच आवडले.
सोनाली जोशी
सोम, 06/08/2007 - 20:46
Permalink
छानच
हेच दोन शेर मलाही खूप आवडले.
मानस६
सोम, 06/08/2007 - 21:37
Permalink
सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...? वा..
मतला ही सुरेख.. एक मूड बनविणारा..
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...? वा..
कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!.. पण इथे २ किंवा ३ मात्रा जास्त आहेत..वाचताना ओघ तुटल्यासारखा वाटला... 'रोज शब्द काढला तर?
-मानस६
प्रदीप कुलकर्णी
सोम, 06/08/2007 - 23:48
Permalink
खूपच छान....
आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्या आरश्यांचे...!
खूपच छान....अगदी हातात आरशाचा, तोही मातीत सापडल्याने मळलेला व नंतर साफसूफ केलेला, तुकडा घेऊन मी कुणाचे तरी डोळे दिपवत आहे, असे वाटले !
पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...
वा...वा...
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
छानच...
...................................
- (कवडसा) कवडशांचे, (आरसा) आरशांचे, वारसा (वारशांचे ), बारसे (बारशांचे), पावशा -पावश्यांचे, भरवसा (भरवशांचे).
मूळ शब्दात जेथे स असतो, तेथे श होतो आणि मूळ शब्दात जेथे श असतो, तेथे श्य होतो. अर्थात या
(अ)शुद्धलेखनीय त्रुटीमुळे अर्थाला बाधा पोचत नाही.
...................................
प्रज्ञा
मंगळ, 07/08/2007 - 18:07
Permalink
किति सुंदर!
आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्या आरश्यांचे...!
किति सुंदर! प्रदिप तुम्हि शेर मस्त उलगडुन दाखविलात हो. धन्य्वाद. गझल अत्तिश्य आवडली.
केशवसुमार
मंगळ, 07/08/2007 - 19:06
Permalink
हेच म्हणतो..
वा डॉक्टरसाहेब,
एकदम सुरेख गझल..सगळेच शेर आवडले..आजून येऊद्या..
आमचा दुसरा एक प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 07/08/2007 - 19:35
Permalink
कोणते दोन शेर?
कोणते दोन शेर? कळवाल का?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
जयन्ता५२
गुरु, 09/08/2007 - 14:11
Permalink
अंतिम सत्य
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
--- खरय डॉक्टर्...हेच अंतिम सत्य आहे!!
गझल नेहमी प्रमाणे दर्जेदार!
जयन्ता५२
पुलस्ति
शुक्र, 10/08/2007 - 07:33
Permalink
वा!
मतला आणि शेवटचा शेर खूप आवडला!!
उदय नावलेकर
मंगळ, 14/08/2007 - 12:56
Permalink
सुंदर गझल आहे
सुंदर गझल आहे. शा-श्याची सूट चालुन जाइल.