... वंशातल्यांचे

मी पुरावे शोधले त्यांच्यातल्यांचे
अन् दुरावे रोखले माझ्यातल्यांचे

चालली कसरत अशी अर्थासभोती
नाच नंगे खेळती शब्दातल्यांचे

एकही शत्रूस नाही सोडले मी
काय मग होईल या हृदयातल्यांचे ?

येर बसती सज्जनांच्या पंगतीला
बेत काहीसे फसावे आतल्यांचे

सत्य कोठे माहिती आहे कुणाला ?
नाव होते आजही पेल्यातल्यांचे

सोडती घरटे... तरी सोडा म्हणावे
मन कधी मोडू नये डोळ्यातल्यांचे

नाव माझे 'अजय' मीही सार्थ केले
पण, जगाला पाहिजे वंशातल्यांचे

गझल: 

प्रतिसाद

सत्य कोठे माहिती आहे कुणाला ?
नाव होते आजही पेल्यातल्यांचे

चांगली द्विपदी.

डॉ.कैलास

नाव माझे 'अजय' मीही सार्थ केले
पण, जगाला पाहिजे वंशातल्यांचे

उत्तम शेर !!!

सोडती घरटे... तरी सोडा म्हणावे
मन कधी मोडू नये डोळ्यातल्यांचे

ब्युटी !!!!!!!

चांगली रचना...उशीरा मिळाली , पण मिळाली हे भाग्य!