दे चार श्वास दे रे ..

दे चार श्वास दे रे अजुनी जगायला
येणार प्रीत आहे मजला बघायला..

शृंगारुनी तरीही येतील लोक ते
लागेल वेळ थोडा त्यांना निघायला..

म्हणतील कैक वेळा "होता भला!",मला
जे पेटवून मजला निघतील जायला..

समजू नको खरी ही सारीच आसवे
रडती कुणी उगाही नजरेत यायला..

ओसंडतील कोणी ह्रदयातुनी इथे
क्षण चार दे तयांचे डोळे पुसायला..

मग हळहळून माझे करतील सोहळे
लागेल मी जगाला जेव्हा कळायला..

गझल: 

प्रतिसाद

आ हा!
अगदी खरं!

शृंगारुनी तरीही येतील लोक ते
लागेल वेळ थोडा त्यांना निघायला.

समजू नको खरी ही सारीच आसवे
रडती कुणी उगाही नजरेत यायला.

ओसंडतील कोणी ह्रदयातुनी इथे
क्षण चार दे तयांचे डोळे पुसायला.

बस! सगळं सांगुन झालं!
या पेक्षा काय लिहावं आणखी कविने?

धन्यवाद ! ताई
वेळ मिळाल्यास माझ्या बाकीच्या गझलाही वाच..

ओसंडतील कोणी ह्रदयातुनी इथे
क्षण चार दे तयांचे डोळे पुसायला..

सही! आवडली गझल.

म्हणतील कैक वेळा "होता भला!",मला
जे पेटवून मजला निघतील जायला..
छान. माझ्याही अशाच काहीशा ओळी होत्या...
चांगले म्हटले मुखी, पोटात होत्या भावना...
"काय हो मिळणार या प्रेतास आता दुखवुनी"

मग हळहळून माझे करतील सोहळे
लागेल मी जगाला जेव्हा कळायला..
व्वा!
(लागेल च्या ऐवजी लागेन असे हवे होते का?)

सुंदर गझल... मांडणी आवडली...

क्रांतीजी, अजय, नचिकेत....खूप खूप धन्यवाद!!!

अजय तुमचाही मिसरा छान आहे!

मतला आवडला. बाकी गझलही छानच. शुभेच्छा.

मस्त गझल्,खुप आवडली.