बहरता बहरता.....

पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे

तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

पत्थरांशी हबा का खेळ मांडतो?
बावळ्याला कधी कळतील माणसे

गझल: 

प्रतिसाद

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

जास्तच आवडला.
गझल उत्तमच.

छान आहे

छान आहे!

तू (तिची) एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील (माणसे)

?
कळले नाही,

गंगाधरजी, शाम,
दोघांचेही आभार!

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

वा... वा...

आभारी आहे वैभव!

ह.बा.

गझल लयीत वाचता आली नाही.

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

सर्वांचा आभारी आहे.