फडफडतो काळजात माझ्या...

फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

किती किती होकार घेउनी वेळा आल्या, गेल्या
हाय ! अपूरा पडला माझ्या तळहाताचा कागद

अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनुन वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद

शहर नवे होते कोणाची ओळख पाळख नव्हती
'नाही' 'नाही'ने भरला माझ्या दिवसाचा कागद

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

अखेर पुसता आली नाही ती चुकलेली नावे
लेखण होती दगडाची, होता दगडाचा कागद

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है वैभव जी....... यू मेड माय डे....

झाडून सगळी गझल फाडू झालीय..... कुण्या एका शेराचा उल्लेख करत नाही.

खू छान....

फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनून वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

छान.... !!!! आवडले...!!!

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

व्वा!! वैभव व्वा!!! एक नंबर....
काबीले तारिफ...

अप्रतिम !!!

फार आवडली ही गझल, वैभवराव.

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनून वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद

शहर नवे होते कोणाची ओळख पाळख नव्हती
'नाही' 'नाही'ने भरला माझ्या दिवसाचा कागद

आहाहा...
अद्भुत, विलक्षण, अवर्णनीय !
सगळी गझल सुरेख झालीये अगदी.

"तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद" हे याच गझलेबद्दल म्हणावेसे वाटते आहे !

शहर नवे होते कोणाची ओळख पाळख नव्हती
'नाही' 'नाही'ने भरला माझ्या दिवसाचा कागद

वाव्वा.

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

वाव्वा. गझल फार चांगली झाली आहे.

वा वैभवजी,
मस्त!
ही तर अप्रतीम कविता आहे !

काय राव आमच्यासाठी शिल्लक ठेवा काही...

अवर्णनीय !!!!!!!!!!

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

अखेर पुसता आली नाही ती चुकलेली नावे
लेखण होती दगडाची, होता दगडाचा कागद

सुरेख!!!

सगळ्याच कल्पना व शब्दनिवड सुंदर! ती शिकल्याचा कागद हा शेर मस्त आहे.

मात्र ही गझल मला पटली नाही.

१. कागद हा शब्द काही ठिकाणी अनावश्यक वाटून गेला. (मतल्यात दोन वेळा येणे व तळहाताचा कागद या शेरात)

२. आजोबांचे अद्भुत पुस्तक हा शेर काही सांगत नाही असे वाटले.

३. दगडाची लेखणी व सागरशाई हे 'संदर्भांचा' अधिक विचार करायला लावणारे शेर वाटले.

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद....

सुंदर!

छान कविता!!

अप्रतिम!!!