''चेहरा''
''चेहरा''
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या
हाय ! आता आगही जाळीत नाही
वाटण्या आलो जगाला मोद किंतू
सौख्य इतुके माझिया झोळीत नाही
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ते सरळ ओळीत नाही
सौख्य अज्ञाना मधे ही गोष्ट सच्ची
का तुला ”कैलास” हे माहीत नाही?
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 07/09/2010 - 23:25
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
छान शेर!
गंगाधर मुटे
बुध, 08/09/2010 - 21:04
Permalink
जाळीत, झोळीत, ओळीत छान शेर!
जाळीत, झोळीत, ओळीत
छान शेर!
बहर
रवि, 12/09/2010 - 04:55
Permalink
डॉक्टरसाहेब.. मस्त गझल. मतला
डॉक्टरसाहेब.. मस्त गझल. मतला आवडला.
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ते सरळ ओळीत नाही
ऐवजी
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ता सरळ ओळीत नाही
असे हवे का? रस्ते हे अनेकवचन लावलं तर ओळीत नाहीत असं लिहावं लागेल ना?
चु.भू.द्या.घ्या.
बहर.
निलेश कालुवाला
बुध, 22/09/2010 - 19:52
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही.....वा.
साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या
हाय ! आता आगही जाळीत नाही.........आशय आवडला.
सौख्य अज्ञाना मधे ही गोष्ट सच्ची
का तुला ”कैलास” हे माहीत नाही?.....खुप छान.
कैलासजी,
सुंदर रचना.गझलेतील शेरांमधला आशय मनाला जास्त भावला.
शुभेच्छा!
वैभव देशमुख
शनि, 02/10/2010 - 10:28
Permalink
चालतो मी आजही नाकासमोरी पण
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ता सरळ ओळीत नाही
चांगली गझल...
शाम
सोम, 04/10/2010 - 09:10
Permalink
चालतो मी आजही नाकासमोरी पण
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ता सरळ ओळीत नाही..
सगळ्या द्विपदी खूपच सुंदर...शुभेच्छा!
कैलास गांधी
सोम, 04/10/2010 - 13:00
Permalink
चालतो मी आजही नाकासमोरी पण
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ता सरळ ओळीत नाही
क्या बात है!!!
.....
रस्ता इतका सरळ कि कळ्ले चुकला रस्ता
मग वाटेतील दगडांनाही हटकत गेलो.
आठवला!
चित्तरंजन भट
शुक्र, 04/03/2011 - 10:54
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
छान.
सारंग_रामकुमार
सोम, 07/03/2011 - 00:09
Permalink
मार डाला! थोडीही कीव केली
मार डाला!
थोडीही कीव केली नाहीत आमची,
आता नरकातून प्रतिसाद देतोय!
रामकुमार
महेश बाहुबली
गुरु, 26/05/2011 - 14:35
Permalink
साहिल्या इतक्या झळा या
साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या
हाय ! आता आगही जाळीत नाही... क्या बात है
वीरेद्र बेड्से
मंगळ, 31/05/2011 - 15:42
Permalink
चालतो मी आजही नाकासमोरी
चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ता सरळ ओळीत नाही
छान ! सु॑दर ,वा.
मस्त गझल्,आवड्ली.
अनिल रत्नाकर
रवि, 19/06/2011 - 08:53
Permalink
खुप आवडली गझल.
खुप आवडली गझल.