... या नभी अंधारवेना
सांजले ! पण सूर्य कलती दाखवेना...
ती दिसेना ! या नभी अंधारवेना ...
पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना
एवढी नव्हती सवय कुठल्या सुखाची
दूरदेशी, बघ, मलाही राहवेना
मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना
ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी ! नव्याने सोसवेना
प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना
पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना
शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना
दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना
सूर्य तेंव्हा पाहिजे होता मला; पण..
चांदण्यांची रास काही मोडवेना
एवढा फिरतोस वणवण का 'अजय' तू...?
की तुलाही एकटेपण साहवेना....?
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
बुध, 01/09/2010 - 14:33
Permalink
अतिशय छान गझल अजय, परदेशातील
अतिशय छान गझल अजय,
परदेशातील वास्तव्यास शुभेच्छा! गझल आवडली.
-'बेफिकीर'!
कैलास
बुध, 01/09/2010 - 15:57
Permalink
वाह... क्या बात है.... एक
वाह... क्या बात है....
एक दमदार गझल...
ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी ! नव्याने सोसवेना
पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना
दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना
हे तीनही शेर खू....प आवडले..... पण याखेरिज इतर शेरही चांगले.... अभिनंदन.
ह बा
बुध, 01/09/2010 - 17:11
Permalink
संपुर्ण गझल आवडली... दु:ख
संपुर्ण गझल आवडली...
दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना
हा शेर खासच!!!
चित्तरंजन भट
गुरु, 02/09/2010 - 10:50
Permalink
मी तिचा नाही असे वाटून
मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना
वा
दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना
वाव्वा. एकूणच गझल छान झाली आहे.
क्रान्ति
गुरु, 02/09/2010 - 20:20
Permalink
पाहिले विस्फोट, आई
पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना
सुन्न केलं या द्विपदीनं! गझल खूप खूप आवडली. सगळ्याच द्विपदी खास!
अजय अनंत जोशी
शुक्र, 03/09/2010 - 07:42
Permalink
बेफिकीर, कैलास, ह.बा.,
बेफिकीर, कैलास, ह.बा., चित्तरंजन, क्रांती धन्यवाद!
निलेश कालुवाला
बुध, 22/09/2010 - 20:45
Permalink
अजयजी, एकदम दमदार गझल. पाहिले
अजयजी,
एकदम दमदार गझल.
पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना
खूप आवडला हा शेर.
प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना
खूपच छान...
मनापासून खूप आवडली गझल.लिखाणास शुभेच्छा.
वैभव देशमुख
शनि, 02/10/2010 - 13:53
Permalink
वाह... क्या बात है....
वाह... क्या बात है....
शाम
शनि, 02/10/2010 - 14:18
Permalink
भावनांना शब्द मज देता न
भावनांना शब्द मज देता न आले
वाटलेही खूप बोलू , बोलवेना..
अप्रतिम...
अजय अनंत जोशी
गुरु, 07/10/2010 - 22:23
Permalink
निलेश, वैभव, शाम धन्यवाद!
निलेश, वैभव, शाम धन्यवाद!
supriya.jadhav7
रवि, 10/10/2010 - 08:06
Permalink
शस्त्रक्रीया आज हृदयाचीच
शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना
खूप खूप खोलवर घांव घालून गेली ही गझल!
-सुप्रिया.
अजय अनंत जोशी
रवि, 17/10/2010 - 18:29
Permalink
सुप्रिया, मनापासून धन्यवाद!
सुप्रिया,
मनापासून धन्यवाद!