जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शुक्र, 12/03/2010 - 19:53
Permalink
सुचावे न काही रुचावे
वा! एकंदर छान. गझल आवडली.
अजय अनंत जोशी
शुक्र, 12/03/2010 - 23:47
Permalink
हाय! शामली , १ला आणि शेवटचा
हाय! शामली ,
१ला आणि शेवटचा शेर आवडला.
एकूण छान.
अनिल रत्नाकर
शनि, 13/03/2010 - 00:08
Permalink
नोंदले मी तुलाही
नोंदले मी तुलाही समासी
अप्रतिम.
ऋत्विक फाटक
शनि, 13/03/2010 - 18:12
Permalink
वा:! सुंदरच आहे गझल! न कळते
वा:! सुंदरच आहे गझल!
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
हा विशेष आवडला!
रचना ओघवती आहे, चाल दिल्यावर अजून छान वाटेल!
श्यामली
शनि, 13/03/2010 - 20:22
Permalink
आपल्या सर्वांच्या
आपल्या सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मंडळी
गंगाधर मुटे
शनि, 13/03/2010 - 21:25
Permalink
सुंदर गझल. आवडली.
सुंदर गझल. आवडली.
बेफिकीर
रवि, 14/03/2010 - 08:57
Permalink
मतला व खुलासे आवडले. श्यामली
मतला व खुलासे आवडले. श्यामली व कामिनी ही आपली दोन्ही नावे उत्तम आहेत, 'रिअल नेम' कोणते? (गै. न)
श्यामली
सोम, 15/03/2010 - 22:23
Permalink
दोन्ही रिअलच नेम आहेत
दोन्ही रिअलच नेम आहेत हो...अभिप्रायाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
(गै. क.?)
प्रताप
मंगळ, 16/03/2010 - 09:38
Permalink
खुप छान. गंध आवडले.
खुप छान. गंध आवडले.
खलिश
मंगळ, 23/03/2010 - 07:53
Permalink
छान ग़ज़ल.... मतला आणी बाकी चे
छान ग़ज़ल.... मतला आणी बाकी चे शे`र ही छान... प्रतिसाद देण्यात जरा उशीर झाला. क्षमस्व.....
` ख़लिश ' - वि.घारपुरे / २३-०३-२०१०.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:24
Permalink
सुचावे न काही रुचावे
सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अप्रतिम रचना!!!
श्यामली
सोम, 21/06/2010 - 20:33
Permalink
पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी
पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी
दशरथयादव
शुक्र, 02/07/2010 - 13:36
Permalink
छान......... जशा कैक होत्या
छान.........
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
मिलिन्द हिवराले
गुरु, 05/08/2010 - 14:46
Permalink
गझल आवडली. शुभेच्छा...
गझल आवडली. शुभेच्छा...
बहर
रवि, 08/08/2010 - 14:57
Permalink
चांगली गझल आहे.
चांगली गझल आहे.
अभिराम पुराणिक
बुध, 11/08/2010 - 11:42
Permalink
खुप छान आहे गझल मनाला भावली.
खुप छान आहे गझल मनाला भावली.
अवधुत
सोम, 16/08/2010 - 12:44
Permalink
अप्रतिम गझल जशा कैक होत्या
अप्रतिम गझल
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
खुपच सुरेख .......
बहर
मंगळ, 24/08/2010 - 23:54
Permalink
पुन्हा वाचली... आता मात्र
पुन्हा वाचली... आता मात्र मतलाच आवडला. पण तो खूप सहज आला आहे. हे ही आहे. :)
आदित्य_देवधर
गुरु, 26/08/2010 - 20:46
Permalink
गझल छान झाली आहे! अभिनंदन
गझल छान झाली आहे!
अभिनंदन