नास्तिक...!
नास्तिक...!
-----------------------------------------------------------------------------------------------
देव होता कसा कोण पाहीला नाही,
आज माझ्यातही देव राहीला नाही...
रेखिली ही ललाटे अशी गूढ सारी,
भोग भोगायचा कोण राहीला नाही...
आसवांचे किती पूर वाहून गेले,
एक अश्रुसुद्धा आज वाहीला नाही...
देव पाण्यात मी सोडलेले जरीही,
मी कुणालाच पाण्यात पाहीला नाही...
आयुष्य हे सोस सोसून मेले,
शेवटाचा तरी घाव साहीला नाही...
जाहलो मी खरा होय नास्तिक येथे,
मीच माझ्यातला देव पाहीला नाही...
----------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
बुध, 25/08/2010 - 22:58
Permalink
तुमचा प्रयत्न स्तुत्य
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
प्रत्येक ओळ एकाच वृत्तात हवी. एकदा का मतल्यात वृत्त निश्चित झाले की तेच वृत्त पुढे चालवायला हवे. तूर्तास वृत्तपालनाचे बघा. वृत्ताचे तंत्र एकदा जमले की मग अलामत, यमक-अन्त्ययमक ह्यांचा अभ्यास करा.
आणि संदर्भासाठी खालील लिंक बुकमार्क करून ठेवा:
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
गंगाधर मुटे
गुरु, 26/08/2010 - 19:34
Permalink
आशय छान आहेत.
आशय छान आहेत.