दाखला


हा दाखला तो दाखला
"तू जन्मला, तू संपला"

असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला

करता उद्याचे बेत मी
तो काळ छद्मी हासला!


धावा कधी केला न मी
मग तो मला का पावला?

माझ्यात जो होता म्हणे
आत्मा मला ना गावला


जन्मेन मी अजुनी पुन्हा
हा मोक्ष मज ना भावला


 


(जयन्ता५२)



 


गझल: 

प्रतिसाद

छद्मी काळ आणि मोक्ष शेर खासच!
मतल्यात "हा जन्मला, तो संपला" असे केले तर "तू जन्मला (स)" ची तडजोड टळेल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति.

असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला
वाव्वा! जयंतराव. गझल आवडली.

जयंतराव,
सुंदर गझल.. सगळेच शेर सुंदर आहेत.
करता उद्याचे बेत मी
तो काळ छद्मी हासला! - वा!
पहिले २ शेर आणि 'मोक्ष'ही आवडले.
- कुमार

श्री. जयंता,
तुमच्या दोन्ही गझलांवर परखड प्रतिक्रिया द्यायची ती एवढीच की दोन्ही गझला छानच आहेत. विशेष म्हणजे त्यांवर आलेल्या प्रतिक्रियाही अगदी न्याय देणार्‍याच आहेत. केवळ कळवा म्हणालात म्हणून कळवतो आहे असे नव्हे. मला जे जाणवले ते मत नोंदवतो आहे. स्वीकारावेच असेही नाही. माझा सर्वच आवडलेल्या गझलांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न असतो. वेळ आणि त्यातून इंटरनेट्चे सहकार्य मिळणे एवढाच 'तांत्रिक 'भाग आड येतो..(तिथेही 'सभ्यता' आड येतेच). असो.
असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला
हा शेर पहिल्या शेराशी मुसलसल झाला आहे. बाकी शेर तसे नाहीत. पण चालते ! असे माझे मत आहे. किमान तो दोष न ठरावा. (अनेकांच्या / माझ्याही काही गझलांत ही 'अडचण' आलेली आहे). नाही म्हणलं तरी 'दो' हा शब्द तत्सम आला. पण तोही बोली भाषेत खूपच रुळलेला असल्यामुळे धकून जातो.
'दाखला'तील शेवटचा शेर मला खूपच आवडला. 'काळ' हा शेरही सुंदरच!
अभिनंदन.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०