कणसूर
का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे?
कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे?
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की !
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे
गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते
(शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे)
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
गझल:
प्रतिसाद
गंगाधर मुटे
गुरु, 12/08/2010 - 21:21
Permalink
पैज लावा - कीर्त त्याची फारशी
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
फारच सुंदर शेर.
कैलास
गुरु, 12/08/2010 - 21:27
Permalink
मुटेजींनी नमुद केलेला शेर
मुटेजींनी नमुद केलेला शेर आवडला.
बाकीचे शेर संदिग्ध वाटले.
पुलेशु.
डॉ.कैलास
बहर
गुरु, 12/08/2010 - 23:36
Permalink
मला मतलाच आवडला.
मला मतलाच आवडला.
कैलास गांधी
शुक्र, 13/08/2010 - 12:03
Permalink
का जिवाला आज त्याच्या लागली
का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे?
कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे?
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की !
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
हे दोन मतला, शेर आवड्ले...
निलेश कालुवाला
शनि, 14/08/2010 - 08:17
Permalink
पैज लावा - कीर्त त्याची फारशी
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
आवडला.
चित्तरंजन भट
मंगळ, 17/08/2010 - 10:50
Permalink
लोक सारे दूर जाती - तो जरा
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की !
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
वा..
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
वा..
विसुनाना, बऱ्याच दिवसांनी! येऊ द्या आणखी....
विसुनाना
मंगळ, 17/08/2010 - 11:05
Permalink
प्रतिसाद देणार्यांचा अतिशय
प्रतिसाद देणार्यांचा अतिशय आभारी आहे.
@डॉ. कैलास, संदिग्धता शब्दांत आहे की अर्थात आहे?
@चित्तरंजन भट,प्रयत्न करतो.
कैलास
मंगळ, 17/08/2010 - 11:52
Permalink
विसुनाना.. अर्थातच आहे.
विसुनाना.. अर्थातच आहे. पुन्हा वाचताना अर्थ लागतोय... पण तरीही मतला २ र अन ४ था शेर चा अर्थ लागला नाही.
डॉ.कैलास
विसुनाना
मंगळ, 17/08/2010 - 13:31
Permalink
अर्थातच, अर्थ समजावून सांगावा
अर्थातच, अर्थ समजावून सांगावा लागणे ही गझल/शेर फसल्याची खूण आहे.
-येथे निर्यातले = निर्यात केलेले /झालेले असा अर्थ आहे. 'कोण' या शब्दाचा अर्थ 'कोणि' असा किंवा 'कोणत्या' असा कोणताही घेता येईल.
अर्थ १ : त्याच्या मनात माजलेले काहूर अज्ञातातून कोणी निर्यात केले आहे?
अर्थ २ : त्याच्या मनात माजलेले काहूर कोणत्या अज्ञातातून निर्यात झाले आहे?
- कणसूर म्हणजे जो सूर मूळ शुद्ध स्वरापेक्षा कमी-अधिक लागतो तो. 'कणसूर' ही गायनकलेच्या परिभाषेतली संज्ञा आहे.
त्याचे गीत बेसूर आहे हे निश्चित. कारण काय? तर - तो ज्यावेळी उत्तम, शुद्ध गातो तेव्हा स्वतः शुद्धीत नसतो. (कसल्याशा नशेत असतो.) आता लागलेला सूर मात्र त्याने स्वतः शुद्धीत असताना लावल्यामुळे कणसूर - (निम्न/अशुद्ध) लागला आहे.
हा अर्थ सांगून कवीने त्याचा पराभव मान्य केला आहे. :)
कैलास
मंगळ, 17/08/2010 - 14:06
Permalink
विसुनाना....... हा आपला
विसुनाना....... हा आपला पराभव नाही,माझे अज्ञान आहे...... एक रसिक म्हणून मी माझे अज्ञान मान्य करतो.
डॉ.कैलास