तिथे ये पहाटे...

असा पाट ओला अशी कंच राने
असे चिंब डोळे तुझ्या आठवाने

तिथे ये पहाटे... तिथे... त्या तिथे ये
जिथे पाहिलेले निखारे दवाने

उभे झाड आहे तरी जीव नाही
दिले घाव त्याला कुणा पाखराने?

नको ऐकवू तू तुझा काळ आता
तिला जाळणारे असूरी जमाने

किती खोल व्हावे मनाच्या तळाने?
कितीदा बुडावे... रडावे हबाने?

-हबा शिंदे

गझल: 

प्रतिसाद

व्वा हबा....

असा पाट ओला अशी कंच राने
असे चिंब डोळे तुझ्या आठवाने...... क्या बात है.... ''कंच'' पणा खूप छान..

तिथे ये पहाटे... तिथे... त्या तिथे ये
जिथे पाहिलेले निखारे दवाने

उभे झाड आहे तरी जीव नाही
दिले घाव त्याला कुणा पाखराने?

नको ऐकवू तू तुझा काळ आता
तिला जाळणारे असूरी जमाने

हे शेर फर्मास...

किती खोल व्हावे मनाच्या तळाने?
कितीदा बुडावे... रडावे हबाने?

मस्त मक्ता...... हबा... आता तखल्लुस कायम ठेवा.... खूप चांगली गझल.
पुलेशु.

डॉ.कैलास

क्या बात है हबा!!! बढिया! ही जरा वेगळ्या प्रकारातली गझल वाटली तुमची. मस्त.

सर्वच शेर आवडले.
जिथे पाहिलेले निखारे दवाने ... खासच.

कैलासजी, शाब्बासकीबद्दल आभारी आहे.
बहर, वेगळ्या प्रकारे प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गंगाधरजी, मी ही ती ओळ लिहील्यानंतर जाम खूश झालेलो. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

क्या बात है हबा!!!
किती खोल व्हावे मनाच्या तळाने?
कितीदा बुडावे... रडावे हबाने?

असा पाट ओला अशी कंच राने
असे चिंब डोळे तुझ्या आठवाने....वा व्वा.छान लहजा घेवून आला मतला.

किती खोल व्हावे मनाच्या तळाने?
कितीदा बुडावे... रडावे हबाने?...मक्ताही फार सुरेख.

शुभेच्छा ह बाजी!

गांधीजी, निलेशजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे!!!