ठेवणीतल्या आठवणींना....

.............................................................

गतकाळाच्या कपाटातले जुनेर जगणे दमट, दमट !
ठेवणीतल्या आठवणींना आता येतो वास कुबट !

अश्रूसुद्धा पूर्वीइतके राहिलेत हे तरल कुठे ?
कधीकाळच्या दुःखाचाही झाला आहे रंग फिकट !

त्यांच्या सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू नये...
या श्वासांचे देहासंगे जन्मभरी असणार लगट !

कधीपासुनी एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे रात्रीचे पान उलट !

कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

नाव तुझे मी घेत ईश्वरा घुमत राहिलो सतत जरी...
काय मला देईल देउनी आकाशाचा रिता घुमट ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

कधीकाळच्या दुःखाचाही झाला आहे रंग फिकट !..अप्रतिम.
भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट ! ....अफलातुन शेर.

मतल्यातल्या आठवणी ठेवणीत होत्या, ठेवणीतली आठवण (बरी किंवा वाईट)बराच काळ तशाच पडुन राहिल्याने कुबट वास येत आहे असाच काहीसा अर्थ होतो असे वाटते, नीट कळले नाही.

अश्रूसुद्धा पूर्वीइतके राहिलेत हे तरल कुठे ?
कधीकाळच्या दुःखाचाही झाला आहे रंग फिकट !

त्यांच्या सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू नये...
या श्वासांचे देहासंगे जन्मभरी असणार लगट !

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

हे तीन शेर आवडले. साधीसुधी आणि तरल गझल!

वाहव्वा प्रदीपराव, अप्रतिम गझल.
सगळेच शेर आवडले.

अश्रूसुद्धा पूर्वीइतके राहिलेत हे तरल कुठे ?
कधीकाळच्या दुःखाचाही झाला आहे रंग फिकट !

त्यांच्या सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू नये...
या श्वासांची(?) देहासंगे जन्मभरी असणार लगट !

कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

हे सर्वच शेर अत्यंत आवडले.
धन्यवाद !

सर्वच शेर फार सुंदर.

सगळे शेर आवडले.

व्वा.... सुंदर गझल..

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

हा शेर विलक्षण आवडला.....

डॉ.कैलास

प्रदीपराव, सुरेख गझल. अप्रतिम. सगळेच शेर आवडले.

तूर्तास:
कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !
वाव्वा.

कधीपासुनी एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे रात्रीचे पान उलट !

वाव्वा..
क्या बात है.

दिलखुलास प्रतिसाद देणाऱया सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा...

>>> ज्ञानेश, श्वासांची असेच हवे. टायपिंगच्या वेळी चुकून श्वासांचे असे झाले आहे. त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

सगळी गझल खूप आवडली.

'तो तिच्याशी लगट करतो आहे' या दृष्टीने मला तरी 'ते लगट' योग्य वाटले होते.

नेमका हाच शेर व 'कपट' हे आवडले.

-'बेफिकीर'!

सुंदर गझल!!!

त्यांच्या सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू नये...
या श्वासांचे देहासंगे जन्मभरी असणार लगट !

कधीपासुनी एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे रात्रीचे पान उलट !

कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !
वा वा वा! क्या बात है! हे तीन शेर एकदम जोरदार.
गझल आवडली.
सोनाली

गतकाळाच्या कपाटातले जुनेर जगणे दमट, दमट !
ठेवणीतल्या आठवणींना आता येतो वास कुबट !

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

फारच सुंदर गझल. प्रश्णच नाही.

क्या बात है, प्रदीपसाहेब...
क्या बात है!

फारच सुंदर गझल.क्या बात है!
कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !
वाव्वा.
सगळी गझल खूप आवडली.

कधीपासुनी एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे रात्रीचे पान उलट !

कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !

भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !

खासच! गझल आवडली.

पुन्हा वाचली! सुपर्ब गझल! मला जुनेर हा एक शब्दही मिळाला. जुनेर जगणे!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!