वाटे कधी कधी
वाटे कधी कधी
हातात हात घ्यावा,वाटे कधी कधी
तेव्हाच प्राण जावा,वाटे कधी कधी
दुबळा जरी असे मी,परि संकटात ती
माझा करेल धावा,वाटे कधी कधी
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी
मृत्यू अटळ जरी हा,येणार ''काळ'' तो
वेळीच ज्ञात व्हावा,वाटे कधी कधी
गेले निघोनी सारे, '' कैल्या'' पुढे जरी
मागे ''कुणी'' उरावा,वाटे कधी कधी
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 22/07/2010 - 21:36
Permalink
दुनियेत बेगडी या,झालो बधीर
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी
वाव्वा. खालची ओळ तर फारच. मतलाही छान.
ह बा
शुक्र, 23/07/2010 - 10:29
Permalink
छान.... नाही आवडली.
छान.... नाही आवडली.
गंगाधर मुटे
शुक्र, 23/07/2010 - 10:54
Permalink
दुनियेत बेगडी या,झालो बधीर
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी
सुंदर.
कैलास गांधी
शुक्र, 23/07/2010 - 14:10
Permalink
दुनियेत बेगडी या,झालो बधीर
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी
छान.
केदार पाटणकर
शनि, 24/07/2010 - 15:16
Permalink
मेंदू धुवून घ्यावा..ही कल्पना
मेंदू धुवून घ्यावा..ही कल्पना मस्तच.
कैलास
शनि, 24/07/2010 - 19:40
Permalink
धन्यवाद चित्तजी, धन्यवाद
धन्यवाद चित्तजी,
धन्यवाद हबा... :)
मुटेजी.. धन्यवाद
कैलास राव... धन्यवाद..
केदारजी.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
डॉ.कैलास
अनिल रत्नाकर
रवि, 25/07/2010 - 17:35
Permalink
दुनियेत बेगडी या,झालो बधीर
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी
मृत्यू अटळ जरी हा,येणार ''काळ'' तो
वेळीच ज्ञात व्हावा,वाटे कधी कधी
अप्रतिम.
कैलास
बुध, 28/07/2010 - 18:02
Permalink
धन्यवाद अनिल. डॉ.कैलास
धन्यवाद अनिल.
डॉ.कैलास
बहर
रवि, 08/08/2010 - 15:07
Permalink
डॉक्टरसाहेब... मतला सॉलिडच.
डॉक्टरसाहेब... मतला सॉलिडच. गझलही मस्त आहे. मतला फारच आवडला.
कैलास
गुरु, 12/08/2010 - 21:36
Permalink
धन्यवाद बहर... डॉ.कैलास
धन्यवाद बहर...
डॉ.कैलास
निलेश कालुवाला
सोम, 16/08/2010 - 14:10
Permalink
कैलासजी, बहुदा नजरेतून
कैलासजी,
बहुदा नजरेतून सुटल्यामुळे वाचायची राहिली.(मधे साथीत आजारीही होतो.)
मतला आणि मेंदू फारच आवडले.चांगली रचना.
कैलास
शुक्र, 27/08/2010 - 21:43
Permalink
मनःपूर्वक धन्यवाद निलेश......
मनःपूर्वक धन्यवाद निलेश...... आता तब्येत चांगली असेल ही आशा... आणि ती नेहमीच चांगली राहॉ ही सदिच्छा.