कधी स्वतःच्या ...
कधी स्वतःच्या जगण्यालाही विटलो
कधी अचानक श्वास कुणाचा ठरलो
किती, काय अन् कशाकशाचे सांगू...
कुणाकुणासाठी मी दाने हरलो
कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो
धरती इतकी चिंब कशाने झाली ?
कसा? कुठे? मी... केंव्हा? कधी बरसलो ?
मित्र म्हणावा असा कुणीच मिळेना
जो शत्रू नव्हता त्याचा मग बनलो
पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो
वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 26/07/2010 - 16:28
Permalink
जगा न जमली चाल जराही माझी ही
जगा न जमली चाल जराही माझी
ही ओळ..... आणि
पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो
हा शेर फार आवडला...
डॉ.कैलास
निलेश कालुवाला
मंगळ, 27/07/2010 - 07:56
Permalink
व्वा अजयजी ! बर्याच दिवसांनी
व्वा अजयजी !
बर्याच दिवसांनी टाकलीत.खुप आवडली गझल.
खालील शेर विशेष आवडले.
कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो
पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो
वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो
केदार पाटणकर
मंगळ, 27/07/2010 - 09:15
Permalink
पडलेल्यांना हात देत
पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो
वा!
गंगाधर मुटे
मंगळ, 27/07/2010 - 19:24
Permalink
कुठे माहिती होते छक्के-पंजे
कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
.
जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो
.
वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो
हे विशेष आवडलेत.
अजय अनंत जोशी
बुध, 28/07/2010 - 07:47
Permalink
सर्वांना मनापासून धन्यवाद!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
चित्तरंजन भट
बुध, 28/07/2010 - 08:54
Permalink
गझल छान झाली आहे. असेच लिहीत
गझल छान झाली आहे. असेच लिहीत राहा.
अनिल रत्नाकर
बुध, 28/07/2010 - 14:27
Permalink
अजयजी, आपल्या गझल मनाला
अजयजी,
आपल्या गझल मनाला भावणारा एक सच्चा, अनुभवी धागा असतो. वाचता वाचता आपण होऊन त्यात गुरफटावेसे वाटते.
जीवन माझे विश्वासाने जगलो
..........क्या बात है||
हे म्हणायला हिम्मत पाहिजे.येरागबाळ्याचे काम नाही.
धन्यवाद.
अजय अनंत जोशी
गुरु, 29/07/2010 - 14:13
Permalink
चित्तरंजन अनिल धन्यवाद!
चित्तरंजन अनिल धन्यवाद!
क्रान्ति
गुरु, 29/07/2010 - 15:28
Permalink
खास! आवडली गझल.
खास! आवडली गझल.
ह बा
गुरु, 29/07/2010 - 16:55
Permalink
मित्र म्हणावा असा कुणीच
मित्र म्हणावा असा कुणीच मिळेना
जो शत्रू नव्हता त्याचा मग बनलो
छान गझल. चांगला शेर.
अजय अनंत जोशी
सोम, 02/08/2010 - 07:45
Permalink
क्रांति, ह.बा. धन्यवाद!
क्रांति, ह.बा. धन्यवाद!