बोलताना तोल गेला...

बोलताना तोल गेला

बोलताना तोल गेला,
घाव झाला खोल गेला

कालचा उपदेश माझा,
काय मित्रा फोल गेला?

पैंजणांना चेतवाया,
ढोलकीचा बोल गेला

अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडी-मोल गेला".

नेत्र-बाणा , सांग ना रे,
येव्हढा का खोल गेला?

वाढला अंकुर पण का,
सोडुनी ती ओल गेला?

काय रामाच्या कथेतुन,
जानकीचा रोल गेला?

                -मानस६
गझल: 

प्रतिसाद

बोलताना तोल गेला,
घाव झाला खोल गेला ...( खूपच छान )

कालचा उपदेश माझा,
काय मित्रा फोल गेला? ... ( वा )

पैंजणांना चेतवाया,
ढोलकीचा बोल गेला...( अप्रतिम...फारच छान )

अश्रू (श्रु) सांगे वाहताना,
-"जन्म कवडीमोल गेला"...  ( वा वा )

हे शेर खूप आवडले. शुभेच्छा.

वा . ग़ज़ल छान आहे. आवडली. साधी सोपी सुटसुटीत.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडी-मोल गेला".
वाव्वा.. गझल छान आहे. 
सांगतो वाहून अश्रू असे केल्यास अश्रु करावे लागणार नाही. मतला असा करावासा वाटला..
शब्द साधा खोल गेला
बोलताना तोल गेला

मानसजी,
अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडी-मोल गेला".

वाढला अंकुर पण का,
सोडुनी ती ओल गेला?

हे शेर व गझलही खास!
जयन्ता५२