वाटते बोलायचे राहून गेले
वाटते बोलायचे राहून गेले
आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले
हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले
विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया
आंधळे आले ,तिला '' पाहून '' गेले
मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा
आप्त माझे पाठ मज दावून गेले
माफ केले पाप ते सारे तुझे मी
आसवांसमवेत जे वाहून गेले
पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले
जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण,
वाटते,'' बोलायचे राहून गेले ''
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
ह बा
शुक्र, 16/07/2010 - 17:56
Permalink
यावेळी एक शेराची स्तुती
यावेळी एक शेराची स्तुती करायची गरज नाही.
झाडुन सगळी गझल फाडू आहे.
कैलास गांधी
शनि, 17/07/2010 - 13:31
Permalink
पक्ष कसले?काय्?हे कळते न
पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले
कैलास गांधी
शनि, 17/07/2010 - 13:32
Permalink
पक्ष कसले?काय्?हे कळते न
पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले
कैलास
शनि, 17/07/2010 - 18:00
Permalink
कैलास गांधी,हणमंतराव... खूप
कैलास गांधी,हणमंतराव... खूप खूप धन्यवाद.
डॉ.कैलास
निलेश कालुवाला
सोम, 19/07/2010 - 08:11
Permalink
वा कैलासजी, आजच पाहिली.आपल्या
वा कैलासजी,
आजच पाहिली.आपल्या मताप्रमाणे मागच्या गझलेची त्रूटी या गझलेत भरून काढलीत खरोकर.
मतल्यात 'चुना लावणे' ही म्हण खरेच सार्थ केली.
बाकी ह बां च्या म्हणण्याला माझा दुजोरा आहे.
विडंबनकार बापू
सोम, 19/07/2010 - 11:01
Permalink
गझल आहेच छान हो....
गझल आहेच छान हो....
पण
विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया
आंधळे आले ,तिला '' पाहून '' गेले
हे कशाला घालायच मधे... इतर शेर कसे मुड देतात....हा सामान्य वाटतो.
शुभेच्छा!
कैलास
मंगळ, 20/07/2010 - 10:12
Permalink
धन्यवाद निलेश....... खूप
धन्यवाद निलेश....... खूप आभार..
बापू....
आपले म्हणणे रास्त आहे...... हा शेर सामान्यच आहे....... आमच्या नेरुळ शे जारी एक '' उलवे'' नावाचे गाव आहे.....एकदा सुश्मिता सेन शुटींगसाठी तिथे आली होती.... तोबा गर्दी उसळली होति.... आणि आश्चर्य म्हणजे गावातील २ अंध व्यक्ती शुटींग '' पाहण्या''साठी आल्या हो त्या..... अर्थात शुटींगचा वृत्तांत दुसर्याला विचारूनच जाणून घेत होत्या...... यातून हा शेर जन्मला.....असो... प्रतिसादाबद्दल आपले खूप आभार.
डॉ.कैलास
ह बा
मंगळ, 20/07/2010 - 10:18
Permalink
आपले गाणे पुन्हा गाऊन
आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले
हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले
कैलासजी पुन्हा एकदा वाचली...अप्रतिम. दुसरा शेर प्रत्येक मंगल कार्यालयाबाहेर लिहायला हवा. खर्चात कपात होईल.
कैलास
शनि, 24/07/2010 - 10:26
Permalink
:) धन्यवाद हबा
:)
धन्यवाद हबा
अनिल रत्नाकर
रवि, 25/07/2010 - 17:38
Permalink
सुरेख, सुरेल गझल.
सुरेख, सुरेल गझल.
बहर
सोम, 26/07/2010 - 01:48
Permalink
वा... डॉक्टर... मजा आली
वा... डॉक्टर... मजा आली वाचून.
अजय अनंत जोशी
सोम, 26/07/2010 - 11:48
Permalink
माफ केले पाप ते सारे तुझे
माफ केले पाप ते सारे तुझे मी
आसवांसमवेत जे वाहून गेले
फार छान आहे.
कैलास
मंगळ, 27/07/2010 - 18:19
Permalink
धन्यवाद अनिल्,धन्यवाद
धन्यवाद अनिल्,धन्यवाद बहर,
धन्यवाद अजय जी.
डॉ.कैलास