ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे
प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे
परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे
लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
वाघ झाले शांत पाहून हिंस्र झाली मेंढरे
नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे
आगळा हा निकष लावून लोकगणना जाहली
माणसे नसतील तेथे मोजलेले उंबरे
मोकळ्या नात्यांस जेव्हा संमती होती हवी
काळजीने ग्रासले ते लग्न झाले चेहरे
चक्क आईच्या दुधाचा पाहिला व्यापार तेव्हा
गाय हि गोठ्यात नव्हती, ना तिची ती वासरे
पाहिला मी एक योगी जन्मभर जखमांसावे
वाटले न मग कधीही घाव माझे बोचरे
सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे
....कैलास गांधी
प्रतिसाद
विश्वस्त
शनि, 17/07/2010 - 18:19
Permalink
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव दीर्घ लिहावेत, ही विनंती.
चित्तरंजन भट
रवि, 18/07/2010 - 12:56
Permalink
प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ
प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
ही आणि अशा काही ओळी फार मस्त आहेत.
नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे
ह्या द्विपदीतली 'ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे' ही ओळ वाचून मला माझी गझल प्रकाशित करावीशी वाटली. माझ्या गझलेतली द्विपदी अशी:
तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू
नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
वरील 'पण' जादाचे वाटते आहे.
सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
ही ओळ लयीत/वृत्तात यायला हवी.
गझल एकंदर छानच. फक्त सफाईदारपणा यायला हवा असे वाटते. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
क्रान्ति
रवि, 18/07/2010 - 17:48
Permalink
परतण्याच्या पायवाटा
परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे
खास!
मानस६
रवि, 18/07/2010 - 21:58
Permalink
परतण्याच्या पायवाटा
परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे.. वा वा मस्तच!
गझलेतील आशय उत्तम आहे... जरा वृत्ताकडे लक्ष असू द्यावे
-मानस६
बहर
सोम, 19/07/2010 - 00:18
Permalink
गझल छानच झालीय.
गझल छानच झालीय.
निलेश कालुवाला
सोम, 19/07/2010 - 09:28
Permalink
गझलेतील शेरांचा आशय
गझलेतील शेरांचा आशय आवडला.बाकी वरीष्ठांनी मार्गदर्शन केले आहेच.
ह बा
सोम, 19/07/2010 - 12:29
Permalink
लोकशाहीवर असाही सूड त्यांनी
लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
वाघ झाले शांत पाहून हिंस्र झाली मेंढरे
छान शेर!!!
कैलास गांधी
सोम, 19/07/2010 - 16:13
Permalink
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव दीर्घ लिहावेत, ही विनंती नक्कीच पाळेन...
चित्तरंजनजी, कैलासजी, क्रान्ति, निलेश, मानस,बहर, ह बा आणि गंगाधरजी धन्यवाद. आपले सर्वांचे मार्गदर्शन हवेच आहे ...
चित्तरंजनजी,
नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला,
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे
असे केले तर चालेल का?
आणि
सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
या ओळीला काय करता येईल ते सुचवीले तर बरे होईल..
तसदीबद्दल शमस्व...