नाबाद

रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!

चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्यासाठीच का हा वाद होता??

वेल होती, एक वेडे फूल होते...
बाग माझाही कधी आबाद होता!

लाच द्यावी लागली माझ्या जीवाची..
लाच घेणारा कसा वस्ताद होता!!

खेळ हा कुठला रडीचा खेळला तो??
हारला होता, तरी नाबाद होता!!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!
वाव्वा!!

चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्यासाठीच का हा वाद होता??
वाव्वा!!

गझल आवडली.

मनोगत वर वाचल्याचे स्मरते...... सुंदर गझल.

रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!

चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्यासाठीच का हा वाद होता??

वेल होती, एक वेडे फूल होते...
बाग माझाही कधी आबाद होता!

हे शेर भन्नाट.... वा !!

डॉ.कैलास

वा! मस्त गझल! मतला, लाच, चांदणे अप्रतिम!

मस्त गझल! लाच, चांदणे अल्टी!

मस्त. आवडली.

मस्त.वाचताना एक वेगळी धुंदी चढली.

चित्त.. कैलास..क्रांती..मुटे..हबा...निलेश.. प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!
वाव्वा!!
मस्त. आवडली.