पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले...

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता
लोक होते झोपले कि वार हि हळुवार झाले

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

संधिसाधू दांभिकांची जाहली पुन्हा आघाडी
काळजीवाहू म्हणाया बेगडी सरकार झाले

बोलले काही तरी पण भाविकांना अर्थ कळतो
हे जसे कळले तयांना तेच मग अवतार झाले

येथल्या पोकळ वीरांना राहिली लागून चिंता
गायचा इतिहास कोणी शब्द जर तलवार झाले

......कैलास गांधी

गझल: 

प्रतिसाद

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता
लोक होते झोपले कि वार हि हळुवार झाले

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

येथल्या पोकळ वीरांना राहिली लागून चिंता
गायचा इतिहास कोणी शब्द जर तलवार झाले

वरील शेर खूप आवडले...... सुंदर गझल कैलास.....ठळक केलेला शेर जास्त आवडला.

डॉ.कैलास

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले
चा॑गली गझल...

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

अप्रतिम शेर! गझल आवडली.

लयदार गझल...
बर्‍याच ठिकाणी मीटरसाठी र्‍हस्व-दीर्घ adjust करावे लागतील...
उदा.
पावसाळी ही तरुंना
जंगलातिल बंगल्यांचे
लोक होते झोपले की वार ही हळुवार झाले
पुन्हा घाडी
पोकळ विरांना

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

हा अगदी खरा शेर आला आहे.

छान गझल.

thanks!!!