मारला गेलो

गझल परिचय

वृत्त : वियद् गंगा ( उर्दू : हजज मुसम्मन सालिम )

उर्दू गण मफाइलून मफाइलून मफाइलून मफाइलून

मोडणी लगागागा लगागागा लगागागा लगागागा

लगावली U - - - U - - - U - - - U - - -

मात्रावली १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २

मारला गेलो

जिथे जिंकायचे होते तिथे मी हारला गेलो
जगायाचे जिथे होते तिथे मी मारला गेलो

जिणे संपायला आले तरी सजलो कधी नाही
कशा सरणावरी ऐसा अता शृंगारला गेलो

असा कंटाळलो होतो तशा त्या त्या तराण्यांनी
दिल्या छेडून तारा तू पुन्हा झंकारला गेलो

मवाळा सारखा होतो परी अन्याय मोडाया
न होतो साप मी कैसा तरी फुत्कारला गेलो

अलभ्यच लाभ मी वदलो घरी आल्या रिपूलाही
पहा माझ्या घरी कैसा सदा दुत्कारला गेलो

तसा गोंडस जरी नाही तरी त्या सुस्वभावाने
असा '' कैलास '' मी तान्ह्या परी गोंजारला गेलो.

डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

सर्वच शेर सुंदर.
जिणे संपायला आले तरी सजलो कधी नाही
कशा सरणावरी ऐसा अता शृंगारला गेलो

हा जास्तच आवडला.

छान.
वृत्तात सफाईदारपणा येतो आहे.

शुभेच्छा..!

धन्यवाद गंगाधरजी.....धन्यवाद ज्ञानेश.

डॉ.कैलास

अलभ्यच लाभ मी वदलो घरी आल्या रिपूलाही
पहा माझ्या घरी कैसा सदा दुत्कारला गेलो

तसा गोंडस जरी नाही तरी त्या सुस्वभावाने
असा '' कैलास '' मी तान्ह्या परी गोंजारला गेलो.

हे शेर आवडले.

जिणे संपायला आले तरी सजलो कधी नाही
कशा सरणावरी ऐसा अता शृंगारला गेलो

शेर आवडला...!
शुभेच्छा.....!

धन्यवाद प्रशांत...
आपण उल्लेखिलेला शेर ह्या गझलेतला माझाही आवडता शेर आहे.

डॉ.कैलास

मवाळा सारखा होतो परी अन्याय मोडाया
न होतो साप मी कैसा तरी फुत्कारला गेलो
सुरेख.

धन्यवाद अनिल्,धन्यवाद वामनजी.......
आपला दिलखुलास प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक ठरतो.

डॉ.कैलास

जिणे संपायला आले तरी सजलो कधी नाही
कशा सरणावरी ऐसा अता शृंगारला गेलो

खास शेर.

धन्यवाद प्रसेनजीत...

डॉ.कैलास

सगळेच शेर आवडले. क्या बात है कैलासजी. बढिया!

नोटेड अभिजीत,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

डो.कैलास

धन्यवाद बहर.

डॉ.कैलास