सफल

माझे परममित्र श्री. चित्तरंजन सुरेश भट यांना दादांच्या नावाने स्थापन केलेल्या या संकेतस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा. ही माझी येथील पहिली गझल......


ये रे पुन्हा वसंता, घेतो तुझी दखल मी
आता न राहिलो रे, पूर्वीपरी विफल मी


स्थितप्रज्ञ जाहलो अन्, चिंता पळून गेल्या
माझ्या मनात काही, केले नवे बदल मी


मजला छळावयाला, कोणीच येत नाही
सार्‍या विवंचनांना, देतो अता बगल मी


चंद्रासमान झालो, शुक्लात दिग्बली बघ
कित्येक डाग माथी, दिसतो तरी धवल मी


स्पर्शून याद गेली, सखये तुझी अचानक
धुंदीत त्या अनोख्या, लिहिली नवी गझल मी


सारे गमावले मी, केवळ तुझ्याचसाठी
मज ना कळे 'अगस्ती', झालो किती सफल मी


          ----अगस्ती

गझल: 

प्रतिसाद

चंद्रासमान झालो, शुक्लात दिग्बली बघ
कित्येक डाग माथी, दिसतो तरी धवल मी
वाव्वा, अगस्ती महाशय. सुरेख गझल. आपल्या आगमनाने आनंद झाला. मला एकट्याला शुभेच्छा नको. शुभेच्छा एकमेकांना देऊ या.

मलाही चंद्राची द्वीपदी आवडली.

अगस्ती,आपल्या गझलांविषयी वाचले आहे पण गझला वाचल्या नव्हत्या. यानिमित्ताने आपली एक गझल वाचायला मिळाली.

धन्यवाद.

                                           साती.

चंद्रासमान झालो, शुक्लात दिग्बली बघ
कित्येक डाग माथी, दिसतो तरी धवल मी
क्या बात है!
वाचून तृप्त झालो तव शेर हे सकल मी

गझल आवडली.
मजला छळावयाला, कोणीच येत नाही
सार्‍या विवंचनांना, देतो अता बगल मी
हे खूप खूप आवडले.

स्पर्शून याद् गेली हा शेर् खूप् आवडला.

संपूर्ण गझलमध्ये हा शेर सर्वात आवडला. पण शेर याऐवजी वापरलेला 'द्विपदी' हा शब्द नाही आवडला. इंग्रजी भाषा जशी सगळीकडून शब्द उचलून घेऊन मोठी झाली तसच आपणही चांगले शब्द सगळीकडून उचलायला काय हरकत आहे? 'द्विपदी' जर 'दशपदी'च्या वाटेनं गेली तर ठीक. 'चतुष्पदी'ची दिशा धरली गेली तर?

संपूर्ण गझलमध्ये हा शेर सर्वात आवडला. पण शेर याऐवजी वापरलेला 'द्विपदी' हा शब्द नाही आवडला. इंग्रजी भाषा जशी सगळीकडून शब्द उचलून घेऊन मोठी झाली तसच आपणही चांगले शब्द सगळीकडून उचलायला काय हरकत आहे? 'द्विपदी' जर 'दशपदी'च्या वाटेनं गेली तर ठीक. 'चतुष्पदी'ची दिशा धरली गेली तर?

आहे.
कविवर्य, येथील आपले आगमन आणि वावर सर्वांसाठी आनंददायी होईल यात शंकाच नाही.
गझलेचा मतला मला सगळ्यात जास्त आवडला. 'मजला छळावयाला कोणीच येत नाही' हा मिसराही मस्त आहे.

ये रे पुन्हा वसंता, घेतो तुझी दखल मी
आता न राहिलो रे, पूर्वीपरी विफल मी
सारे गमावले मी, केवळ तुझ्याचसाठी
मज ना कळे 'अगस्ती', झालो किती सफल मी
क्या बात है...
तात्या.