लोक
लोक..
का आता हे आले लोक..?
आले- गेले, - साले लोक...
ह्या वाटेने गेले कोण..?
..सैरावैरा झाले लोक..!
प्रत्येकाला आली धार..
..झाले बरची, भाले लोक
ज्या लोकांनी केला घात,
माझे त्यांत निघाले लोक
ज्याचा त्याचा एकच ध्यास..
..पैसा..धंदेवाले लोक
घेवुनिया तेजाचे ढोंग
अंधारात बुडाले लोक
..सॄष्टी की डोळ्यांचा पूर..?
अन अश्रूंनी न्हाले लोक...
-प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 30/06/2007 - 18:33
Permalink
माझे त्यांत निघाले लोक
ज्या लोकांनी केला घात,
माझे त्यांत निघाले लोक
ज्याचा त्याचा एकच ध्यास..
..पैसा..धंदेवाले लोक
वावावा! गझल आवडली, संतोषराव.
पुलस्ति
सोम, 02/07/2007 - 19:03
Permalink
माझे लोक
माझे लोक, धंदेवाले आणि भाले हे शेर आवडले!
-- पुलस्ति.
प्रदीप कुलकर्णी
सोम, 02/07/2007 - 23:48
Permalink
छान
प्रत्येकाला आली धार..
..झाले बरची (च्या), भाले लोक
छान शेर....
का आता हे आले लोक..?
आले- गेले, - साले लोक...
मतल्यातील साले या शब्दाचा नेमका अर्थ समजला नाही.
आपली गझल वाचून आठवण झाली ती महेंद्रसिंह बेदी `सहर` यांच्या
आए है समझाने लोग
है कितने दीवाने लोग
या गझलेची.....
..................................
फार कुठे आणि भयंकर. या आपल्या अन्य दोन रचनाही छान आहेत. आवडल्या......`भयंकर ` तर भयंकरच आवडली...!
पुलस्ति
मंगळ, 03/07/2007 - 09:46
Permalink
समझाने लोग
अगदी! मलाही तीच आठवली.. आणि जगजीत-चित्राने किती सुरेख गायली आहे ती तेही आठवले...
वक्तपे काम नही आते है, ये जाने-पहचाने लोग... वा!
-- पुलस्ति.
चक्रपाणि
बुध, 04/07/2007 - 10:53
Permalink
वा!
छोट्या बहरातील मस्त गझल. आवडली.
मतला ठीक वाटला; पण खालच्या ओळितील 'साले' शब्दामुळे आवेशपूर्ण झाला आहे. बरची,भालेवाला शेर सुंदरच! 'घात'वाला शेर कल्पनेच्या दृष्टीने आता 'टिपिकल' (तोचतोच) झालाय; पण खालच्या ओळीतील प्रवाह आवडला.
ज्याचा त्याचा एकच ध्यास..
..पैसा..धंदेवाले लोक
वा! हा शेर खूप आवडला.
शेवटून दुसरा शेर जरा अस्पष्ट वाटतो आहे. शेवटच्या शेरात सृष्टी नाही, तर 'वृष्टी' हवे असे वाटले. वृष्टी, अश्रू, पूर यांचा थेट परस्परसंबंध आहे.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
विसुनाना
मंगळ, 10/07/2007 - 12:22
Permalink
गझल उत्तम
प्रत्येकाला आली धार..
..झाले बरची, भाले लोक
एकदम सही शेर... गझल उत्तम!