एका उन्हाची कैफियत...ऐकण्यासारखी
एका उन्हाची कैफियत ही चंद्रशेखर सानेकरांच्या गझलांची सीडी जरूर ऐकावी अशी आहे. ही सीडी खरे तर २००१ या वर्षीची आहे.
या संग्रहात एकूण सात गझला आहेत. सानेकरांच्या शैलीशी ज्यांचा चांगलाच परिचय आहे त्यांची अपेक्षापूर्ती या गझलांनी निश्चितपणे होते. प्रामुख्याने पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या गझला गायल्या आहेत. एक गझल त्यांनी व अमेय दाते यांनी गायली आहे. या गझला पुरुषमुखी आहेत. शेरांमध्ये पुरुषाचे कविमन आहे पण तसे असूनही फेणाणी -जोगळेकर यांच्या तोंडी त्या वावग्या वाटत नाहीत. त्यांनी उत्तम रीतीने परकायाप्रवेश केला आहे.
मयूर पै यांचे संगीत गझलांना योग्य असे आहे. केवळ गझलेत खास दिसणारा तो प्रणय, विरह, गझलेतील हुरहूर व गझलेतील आत्मसंवादाला या चाली पूरक आहेत.
एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला
ही गझल वेगवान आहे. (पिनाझ मसानी यांनी काही उर्दू गझला वेगवान गायल्या आहेत.)
एका गझलेतील कोरस अनावश्यक वाटतो. गझल हा जर दोन जिवांमधला संवाद असेल तर तो कोरस अगदीच अप्रस्तुत आहे.
किशोरकुमारच्या योडलिंगची आठवण जोगळेकर या गझलेत करून देतात. सौमित्र यांचे निवेदन आहे. सौमित्र स्वतः कवी असल्यामुळे त्यांच्याकडून निवेदनाचा विचार झालेला दिसतो. त्यांच्या शब्दफेकीतून हे जाणवते. फाऊंटन म्युझिकने ही सीडी बाजारात आणली आहे.
-केदार पाटणकर
प्रतिसाद
केदार पाटणकर
सोम, 22/02/2010 - 15:58
Permalink
आजपर्यंत एकही प्रतिसाद नाही?
आजपर्यंत एकही प्रतिसाद नाही?
बेफिकीर
सोम, 22/02/2010 - 17:41
Permalink
चांगली माहिती दिलीत केदार!
चांगली माहिती दिलीत केदार! (ही सी.डी. मिळवण्याचा प्रयत्न करतो.)
धन्यवाद!
गझलेत कोरस नसावा हे मत पटलेच. याशिवाय आणखीन असे वाटते की यॉडलिंग, धमपमग वगैरेची तरी गरज कुठे आहे गझलेत? (म्हणजे 'गझलगायनात').
निवेदनाचीही गरज कुठे आहे असेही वाटले.
'आजपर्यंत एकही प्रतिसाद नाही'? - आपण स्वतः तरी कुठे फारसे प्रतिसाद देता? एखाद दुसर्या गझलांनाच प्रतिसाद देताना दिसता. प्रतिसाद देण्यासाठी आपले काही खास निकष असल्यास कृपया समजावेत. (जसे गझलेची गुणवत्ता, कल्पनांमधील नावीन्य, प्रवाही शब्दरचना वगैरे!) प्रतिसादांची अपेक्षा ही अत्यंत नैसर्गीक आहे असे माझे मत आहे. 'आवडली नाही' असे म्हणले तरी दखल घेतल्याचा आनंद कवीला होऊ शकतो. (वेळेचा अभाव हे मान्य आहेच. ) मात्र सर्वांनी सर्व रचनांना, निदान पंधरवड्यातून एकदा तरी पहिल्या दोन पानांवरील रचनांना प्रतिसाद द्यावेत असे मला वाटते.
धन्यवाद!
बेफिकीर
सोम, 22/02/2010 - 17:46
Permalink
आणखीन एक प्रतिसाद देण्याचे
आणखीन एक प्रतिसाद देण्याचे कारण!
माझ्या 'खलाशी' व 'उत्तीर्ण होणार नाहीस' या दोन नवीन गझला बहुधा 'काही तांत्रिक कारणांमुळे' प्रकाशित होतानाच पान क्रमांक दोनवर व त्याही अगदी शेवटी प्रकाशित झाल्या. एकतर आधीच या गझला लोकांच्या समोर नाहीत व त्यात वाचकांपैकी नियमीत प्रतिसाद देणारे चार, पाचच रसिक आहेत म्हंटल्यावर 'त्या प्रकाशित झाल्या नसत्या तरी चालले असते' असे मनात येणे साहजिक आहे.
आता त्या गझला पान क्रमांक तीनवर निवांत स्थिरावलेल्या आहेत. :-))
अजय अनंत जोशी
सोम, 22/02/2010 - 22:58
Permalink
केदार, माहितीबद्दल धन्यवाद!
केदार,
माहितीबद्दल धन्यवाद! पण,
एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला
इतका सामान्य शेर देऊन काय साधलेत कळले नाही.
मी अंधश्रद्धाळू नसल्याने नावावरून प्रतिसाद ठरवत नाही त्याबद्दल क्षमस्व.
बाकी... सीडी ऐकल्यानंतरच.
केदार पाटणकर
बुध, 30/06/2010 - 16:07
Permalink
परवाच ही सीडी पुन्हा ऐकली.
परवाच ही सीडी पुन्हा ऐकली. वा!
एक वेडी...तील पुढचा शेर असा आहे-
हा इरादा तर नसावा एक घरट्याचा तिचा
एक चिमणी रोज हल्ली भेटते आहे मला...
केदार पाटणकर
शनि, 03/07/2010 - 15:06
Permalink
ही सीडी मी पुण्यात घेतली
ही सीडी मी पुण्यात घेतली होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरच संगीतविषयक दुकान आहे. सीडीज, वाद्ये इत्यादी तेथे विक्रीस असते. अन्य कोठे मिळेल, याची कल्पना नाही.
अधिक माहितीसाठी फाउंटन म्युझिक कंपनीत दूरध्वनी करुन पाहावा.
ह बा
शनि, 03/07/2010 - 16:20
Permalink
@ वामन, शोधाशोध करू नये.
@ वामन,
शोधाशोध करू नये. घरपोच मिळेल.