ती काळजीत असते...

गार्‍हाण साठल्यावर ती काळजीत असते
आईस भेटल्यावर ती काळजीत असते

भिजवीत अंग नाही पाऊस पाहताना
रस्त्यात गाठल्यावर ती काळजीत असते

पसरून कुंतलाना ज्याच्यावरी सुखी, तो
वारा पिसाटल्यावर ती काळजीत असते

अंधार भोगण्याची नसते सवड चिउला
चोची पहाटल्यावर...? ती काळजीत असते

तुटली कितेक झाडे झाली सवय तरीही
फांद्या तटाटल्यावर ती काळजीत असते

ह. बा. शिंदे

गझल: 

प्रतिसाद

वॄत्त व्यवस्थित पाळले आहे..... चांगली गझल...... फक्त एक खामी आढळली... ती म्हणजे....सर्व शेरांत एकच आशय व्यक्त होत आहे... असो....

पुलेशु..

डॉ.कैलास

कैलासजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
वामनजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@सर्व शेरांत एकच आशय व्यक्त होत आहे..@@

मज्जा!!! वाचून आनंद झाला.(आशय व्यक्त होतो आहे हे)
आपण एकाच आशयाचे विविध शेर कसे होउ शकतात याचे उदाहरण म्हणुन ही गझल सांगू शकता.

छान गझल.

गार्‍हाण साठल्यावर ती काळजीत असते
आईस भेटल्यावर ती काळजीत असते
गाऱ्हाण हे रूप पहिल्यांदाच वापरलेले बघितले. छान.

तुटली कितेक झाडे झाली सवय तरीही
फांद्या तटाटल्यावर ती काळजीत असते

वा. आवडला. छान झाली आहे गझल.

गंगाधरजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

प्रणवजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चित्तरंजनजी,

@गाऱ्हाण हे रूप पहिल्यांदाच वापरलेले बघितले. छान.@

आपण केलेले काही प्रयोग कुणालातरी न सांगता उमगले आणि त्याने ते योग्य आहे हे सांगितले की बरे वाटते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

धन्यवाद प्रणवजी.