~ या दिलाचे .... ~
या दिलाचे हाल झाले
जे हवे ते काल झाले
वादळे झेलीत गेलो
ते कसे बेहाल झाले
आर्जवे केली किती मी,
का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे
ताल ते बेताल झाले.
पहिले ईश्कास जेंव्हा
वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा
ओठ का ते लाल झाले ?
- रमेश ठोंबरे
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
सोम, 28/06/2010 - 13:27
Permalink
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. एखादी रचना तंत्रशुद्ध नसूनही
ह बा
सोम, 28/06/2010 - 17:06
Permalink
तुम्ही गझल लिहिणे सोडूच नका.
तुम्ही गझल लिहिणे सोडूच नका. तंत्र काय आज, उद्या, नाहितर कधितरी जमायच असेल तेव्हा जमेल.
या गझलेबाबत म्हणाल तर.
झस्द्न्च्व्द्फ्वेय्त्फ्ह!!!