तिजोरी

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला भिकारी

करा साजरे सोहळे प्राक्तनाचे
दिवे लावतो घेउनी मी उधारी

तशी मोजकी आसवे 'एकटया' ची
उशाशी सकाळी मुकी वाटणारी

ज़रा चाखली वर्तमानात आशा
कळे ना कधी भूत झाले विषारी

अजूनी दिवा लावतो सांजवेळी
अजूनी उभा वाट पाहीत दारी

तुझे नाव गेले झिजूनी अताशा
स्मृतीही तुझ्या आज झाल्या फरारी

गझल: 

प्रतिसाद

कितीही निराशा?तुला लाभलेली
किती वार झाले?तुझ्याही जिव्हारी?....... तुमच्या गझलेतील नैराश्यातून सुचला हा शेर.

गझल आवडली....

डॉ.कैलास

तुझे नाव गेले झिजूनी अताशा
स्मृतीही तुझ्या आज झाल्या फरारी

छान. तुमच्या ओळी एकंदरद सफाईदार असतात.

आवडलेला शेर :

ज़रा चाखली वर्तमानात आशा
कळे ना कधी भूत झाले विषारी

गझल छान!

आदित्य,
चांगली रचना आहे. उधारी, फरारी विशेष.

सर्व जाणकारांचे मनापासून धन्यवाद!

तुझे नाव गेले झिजूनी अताशा
स्मृतीही तुझ्या आज झाल्या फरारी
वा वा ...