जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे
नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा सांडणे बरे नव्हे
जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे
विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट ना लागते इथे
कशास चर्चा,तू तर आता मतहि मांडणे बरे नव्हे
तगमग आहे तुझी मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण कांडणे बरे नव्हे
पिकावया शेतात अथक बैल राबतो,ना कधी वळू
शिवार जो नासवतो तैसे,तुझे वांडणे बरे नव्हे
समोर नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो इथे तिथे?
असून सीता लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे नव्हे
डॉ.कैलास
गझल:
प्रतिसाद
अनिल रत्नाकर
बुध, 23/06/2010 - 23:24
Permalink
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण कांडणे बरे नव्हे
खुप छान.
ह बा
गुरु, 24/06/2010 - 10:26
Permalink
विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट
विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट ना लागते इथे
कशास चर्चा,तू तर आता मतहि मांडणे बरे नव्हे
वा! क्या बात है! (क्या बात है)
पुवाशु
कैलास
गुरु, 24/06/2010 - 21:17
Permalink
धन्यवाद अनिल्,धन्यवाद हबा @
धन्यवाद अनिल्,धन्यवाद हबा
@ वामनराव..... आपल्या मताशी मी सहमत आहे.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
शुक्र, 25/06/2010 - 06:50
Permalink
कैलास, दळण चांगले आहे.
कैलास,
दळण चांगले आहे. मिस्किलतेकडे वळलेली रचना.
कैलास
शुक्र, 25/06/2010 - 21:34
Permalink
धन्यवाद अजय...... आपला
धन्यवाद अजय...... आपला प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतो....
डॉ.कैलास
निलेश कालुवाला
शनि, 26/06/2010 - 07:59
Permalink
कैलासजी, पुढील शेर खास
कैलासजी,
पुढील शेर खास आवडले....
विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट ना लागते इथे
कशास चर्चा,तू तर आता मतहि मांडणे बरे नव्हे
तगमग आहे तुझी मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण कांडणे बरे नव्हे