किमया

..............................................
किमया
..............................................

एकरूप माझ्याशी व्हावे उदकाने !
आस कोरडी बाळगली ही खडकाने !

आजच का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने बदकाने !

कधीच गेलो मी शब्दाच्या पलीकडे...
देत बसा वेलांट्या, मात्रा अन् काने !!

लयीत एका शांतपणे तेवे ज्योती...
का तापावे, तडकावे मग तबकाने ?

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !

दोघांमधला फरक फार तर कळेलही...
सिद्ध न होई साम्य परंतू फरकाने !

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

व्वा प्रदिपजी..गजल अवडली.

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !
वाव्वा!

दोघांमधला फरक फार तर कळेलही...
सिद्ध न होई साम्य परंतू फरकाने !
वाव्वा!

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !
अप्रतिम! क्या बात है !!!

संपूर्ण गझल अत्युत्तम झाली आहे हे वेगळे सांगायला नकोच.

गझल आवडली..
मतला नाही आवडला... क्षमस्व!!

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !

संपूर्ण गझल अप्रतिम झाली आहे.

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

पहिले चार शेर मला आवडले नाहीत.

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !
सुरेख ! छान वाटला हा शेर.

दोघांमधला फरक फार तर कळेलही...
सिद्ध न होई साम्य परंतू फरकाने !

या शेराचा आस्वाद घेण्यास अडचण येते आहे. फरकाने 'साम्य' सिद्ध होत नाहीच. या शेराचा आशय कुणी मला उलगडून दाखवल्यास आभारी राहीन.

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !

'कळक' शब्दाचा अर्थ मला ठाऊक नाही. त्यामुळे शेर समजला नाही.
कुणी सांगीतले तर बरे होईल.

कळक म्हणजे बांबू.

धन्यवाद चित्तदा !

दिलखुलास प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

प्रकाशित केलेल्या रचना वाचताना कंटाळा येऊ नये याबाबत जागरूक राहणे हा ज्या त्या कवीचा प्रश्न आहे. (यात सरळ सरळ 'या रचनेबाबतचा' हेतू आहे, बाकी काहीही नाही) असे माझे प्रामाणिक मत!

प्रकाशित केलेल्या रचना वाचताना कंटाळा येऊ नये याबाबत जागरूक राहणे हा ज्या त्या कवीचा प्रश्न आहे. (यात सरळ सरळ 'या रचनेबाबतचा' हेतू आहे, बाकी काहीही नाही) असे माझे प्रामाणिक मत!

ह्या संकेतस्थळावर वावरताना शेरेबाजी किंवा हिणकस टिप्पणी करू नये. वारंवार असेच प्रतिसाद येत राहिले तर प्रतिसादाचे लगेच प्रकाशित करण्याचे अधिकार हिरावून घेण्यात येऊ शकतात.

दिलखुलास प्रतिसाद देणाऱया सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

अपेक्षा:

१) प्रतिसाद - शेरांचे रसग्रहण करणारे असावेत. जाणवलेले विविध अर्थ उलगडून दाखविणारे असावेत.
२) सूचना - गझल या साहित्यप्रकाराला पुढे नेणाऱया असाव्यात. गझल सर्वांगीण कशी बहरेल, त्यासाठी सूचनांचा उपयोग व्हावा.
३) मत - पूर्वग्रदूषित नसावे. कवीची ओळख असो किंवा नसो, गझलेवरील मतातून त्याची ही ओळख डोकावता कामा नये. केवळ आणि केवळ गझलेवरच मत प्रदर्शित करावे.
४) प्रामाणिक मत - वरील उत्तरातून याचे उत्तर मिळावे. आपण मत देताना प्रामाणिक आहोत की नाही, याची खातरजमा आपणच आपल्याशी केली म्हणजे झाले.
५) सल्ला - गझलेसंदर्भातच असावा. आणि तो मानलाच पाहिजे, असा दुराग्रह धरू नये. सल्ला देताना, गझलेचा आपला पुरेसा अभ्यास झालेला आहे ना, असा प्रश्न स्वतःलाच विचारावा.
६) हिणकस टिप्पणी - कवीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
७) शेरेबाजी - एखादी ओळ, शेर, गझल, आवडली नाही तर का नाही हे सांगावे. नुसती शेरेबाजी करू नये.
८) निर्भेळ प्रतिसाद - केवळ गझल आणि गझल यांच्यावरच प्रतिसाद असावेत. शेराचे मर्म, अर्थ, आशय, अभिव्यक्तीची पद्धत आदी बाबीं भर असावा.

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !

पूर्ण गझल आवडली......

खुपच सुन्देर रचना.

मतला खुप आवडला.

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !
अप्रतिम! क्या बात है !!!

आजच का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने बदकाने !

हा हा, फारच सुरेख

कधीच गेलो मी शब्दाच्या पलीकडे...
देत बसा वेलांट्या, मात्रा अन् काने !!
मस्त

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !

वा

दोघांमधला फरक फार तर कळेलही...
सिद्ध न होई साम्य परंतू फरकाने !
वा वा, सुरेख कल्पना