ना ते

ह्या जगाशी ना जुळले नाते
ऊंच आकाशी रुळले ना ते

कष्ट मोठे पण यश ते आले
शेवटाला गाभुळले नाते

हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते

संशयाचे बी रुजले होते
दु:ख झाले हुळहुळले नाते

जन्म माझा संकट ते होते
ऊंब-याशी चुळ्बुळले नाते
......
कार ना थांबे भुरटे नाते
बैलगाडीशी जुळले नाते

गझल: 

प्रतिसाद

मतला आवडला... छान गझल अनिल.

डो.कैलास

धन्यवाद.कैलासजी,
तंत्र चुकत नाही ना, हेच बघायचे होते. आता पुढच्या पायरीवर येण्यासाठी आपल्या सुचनांचा अभ्यास करीन.

उत्क्रुष्ट ओळ!
धन्यवाद वामनजी.

गाभुळले नाते... चा शेर आवडला.

केदारजी आवर्जुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.

ऊंब-याशी चुळ्बुळले नाते
फार छान कल्पना. इतर कोणत्याही ओळीपेक्षा मला ही ओळच जास्त आवडली. मात्र, 'चुळबुळले' असेही चालले असते.

आभारी आहे अजयजी,
आवर्जुन दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.