छानपैकी जगून गेलो मी.....

छानपैकी जगून गेलो मी
छान होतो... म्हणून गेलो मी

प्यायलो कोळुनी विषय सारे
फक्त डोक्यावरून गेलो मी

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

ती दिसावी म्हणून गेलो.. पण..
वाटले की.. कुठून गेलो मी

पाठलागावरील आनंदा
ये इथे तू...... इथून गेलो मी

शोधले पाहिजे स्वतःलाही
पार डोक्यामधून गेलो मी

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी

एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी

मी खरा....... 'बेफिकीर' दु:खांनो
वेळ आली नसून गेलो मी

गझल: 

प्रतिसाद

खूप छान !
खालील शेर विशेष आवडले.

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी

मी खरा....... 'बेफिकीर' दु:खांनो
वेळ आली नसून गेलो मी

बेफिकीर तखल्लुस खूप शोभून दिसतय या रचनेत!
---------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी
वा वा! फारच छान.
आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी
वा वा! हे ही...

एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी
सुंदर!

मी खरा....... 'बेफिकीर' दु:खांनो
वेळ आली नसून गेलो मी
खरे आहे. अचूक. काम करणार्‍याला असेच करावे लागते.

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी

सुंदर शेर !
गझल आवडली.

आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी

एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी

सहज सुंदर गझल !

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी

अप्रतिम रचना!!!

सहज रचना. मस्त.
एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी
\
हा शेर फार आवडला, धन्यवाद.

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

वा! मस्त. ठसन आवडली आणि एकंदर गझलही. चांगलीच झाली आहे.

सर्वांचे मनापासून आभार!

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

छान गझल ....!

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

छान आशयाने भरलेली गझल.

निलेश कालुवाला.

एक रस्ता असून पर्यायी
आज गावामधून गेलो मी

भन्नट.

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

मार दाला यार!!!

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

आपलेसे कुणीच नसण्याला.....
आपलेसे करून गेलो मी

मी खरा....... 'बेफिकीर' दु:खांनो
वेळ आली नसून गेलो मी

वा वा,, वाचायची राहून गेली होती...... छान गझल.

डॉ.कैलास

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

प्यायलो कोळुनी विषय सारे
फक्त डोक्यावरून गेलो मी

वा,,, सुंदर गझल.

वा भूषणराव! गझल छान झाली आहे!

वाट होती तिथून गेले ते
वाट झाली..... जिथून गेलो मी

खुप छान!