नको तेच झाले

पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही

कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही

मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

गझल: 

प्रतिसाद

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

व्वा !! छान.

डॉ.कैलास

जरा बोलले मी; रुढीहून काही
मुके राहणेही विरोधात माझ्या,

भन्नाट

पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

वाव्व्वा! चांगली झाली आहे गझल. फार आवडली.

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले;

मस्त !!!

क्रांती मला वैयक्तिकदृष्टिकोनातून गझल थोडी कृतक व कृत्रिम वाटली. असो.
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
हे शेर आवडले. मस्त.

धन्यवाद.

किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
उत्तम!!!
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

छान गझल!

वा, मस्त गझल.
दुरावे आणि मुके राहण्याचे शेर आवडले.

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

आवडले !

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

आवडले !

काय बोलू? सारी गझलच अप्रतिम...

निलेश कालुवाला.

किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
उत्तमेस्ट!!!

संपूर्ण गझल अप्रतिम...

सुरेख!

सगळे पेच आवडले!

पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

वाव्व्वा! चांगली झाली आहे गझल. फार आवडली.